घराची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे, कारण घर स्वच्छ असेल तर आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहते. घर स्वच्छ असेल तर तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. घरात झाडू ठेवण्याविषयी वास्तुशास्त्रात काही नियम आहेत, जाणून घेऊयात….
पायाने स्पर्श करू नका
योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी दक्षिण, पश्चिम दिशा सर्वांत शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, त्या दिशेला झाडू ठेवल्याने घरात सुख, शांती, संपत्ती व समृद्धी येते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो.

असे ठेवू नका
झाडू कधीही भिंतीवर उभा करून ठेवू नये, त्याला जमिनीवर सपाट ठेवावा.
नवीन झाडू
नवीन झाडू खरेदी करण्यासाठी अमावास्या किंवा शनिवार, मंगळवार व शुक्रवार हे चांगले दिवस आहेत. तर, सोमवार आणि शुक्ल पक्षामध्ये खरेदी करणे अशुभ मानले जाते.
स्थान
झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो थेट दिसणार नाही. तो उघड्यावर ठेवल्याने घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात. घराच्या प्रवेशद्वाराजवळ झाडू ठेवणे अशुभ मानले जाते.
स्वच्छता
तुटलेला किंवा जुना झाडू घरात ठेवू नये, कारण तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्यामुळे तो ताबडतोब बदला.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











