Margashirsha Month 2025 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. या महिन्यात दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या महिन्यात स्नान करणे, दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. तसेच या महिन्यात केले जाणारे कार्य अत्यंत फलदायी असते.
मार्गशीर्ष महिना केव्हा सुरु होणार
यंदा गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे. यानंतर शुक्रवार २१ नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल. जसे आम्ही सांगितलं की हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. यावर्षी मार्गशीर्षमध्ये एकूण ४ गुरुवार येत आहे. पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा २७ नोव्हेंबरला असणार आहे. Margashirsha Month 2025

धार्मिक महत्त्व
प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हणतात की, या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सदैव लक्ष्मी – नारायणाचा आशीर्वाद मिळतो. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.
यंदाचे गुरुवार कधी आहेत ?
पहिला गुरूवार – 27 नोव्हेंबर
दुसरा गुरूवार – 04 डिसेंबर
तिसरा गुरूवार – 11 डिसेंबर
चौथा गुरूवार – 18 डिसेंबर
मार्गशीर्ष महिन्यात काय करावे? Margashirsha Month 2025
मार्गशीर्ष महिना भगवान हरिचे प्रतीक आहे. म्हणून, दररोज भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची (लाडू गोपाळाची) पूजा करा.
मार्गशीर्ष महिन्यात नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. विशेषतः यमुना किंवा गंगा नदीत स्नान करणे हे अमृत स्नानासारखे मानले जाते. यामुळे पापे धुऊन जातात.
मार्गशीर्ष महिन्यात (Margashirsha Month 2025) घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मंदिरात तुळशीच्या झाडाजवळ नियमितपणे दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते.
या महिन्यात, विशेषतः एकादशी आणि पौर्णिमेला गीतेचे पठण केल्याने ज्ञान आणि मोक्ष मिळतो.
मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा कपडे दान करा किंवा तीळ दान करा . यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात.
या महिन्यात शंखाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते, कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.).











