Margashirsha Month 2025 : मार्गशीर्ष महिन्यात दान करा या वस्तू; मिळेल मोठं पुण्य

मार्गशीर्ष महिन्यात तांदूळ, मसूर, पीठ आणि गूळ यांसारखे पदार्थ दान करणे शुभ मानले जाते. या दानधर्मामुळे तुमच्या घराची भरभराटी होऊ शकते.

Margashirsha Month 2025 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे.  महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. या महिन्यात दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या महिन्यात स्नान करणे, दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात काही वस्तूंचे दान केल्याने ही चांगलं फळ मिळतं असं बोललं जातं. आज आपण जाणून घेऊया कोणत्या वस्तू दान कराव्या.

मार्गशीर्ष महिन्यात या वस्तू दान करा –

मार्गशीर्ष महिन्यात तांदूळ, मसूर, पीठ आणि गूळ यांसारखे पदार्थ दान करणे शुभ मानले जाते. या दानधर्मामुळे तुमच्या घराची भरभराटी होऊ शकते.

गरजू व्यक्तींना कपडे पैसे तसेच ब्लॅकेड दान करू शकता . हा महिना थंडीचा असल्याने या वस्तू गरजूंच्या उपयोगी पडतील आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटत राहतील. Margashirsha Month 2025

मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला तीळ, गूळ आणि काळे चणे (उडीद डाळ) दान करणे देखील शुभ मानले जाते.

मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या पूर्वजांच्या शांतीसाठी प्राणी आणि पक्ष्यांना खायला घाला.

याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात पूजा साहित्य किंवा अन्न देखील मंदिरांना दान केले जाऊ शकते.

यंदा कधीपासून सुरू होतोय मार्गशीर्ष महिना

यंदा गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे. यानंतर शुक्रवार २१ नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल. जसे आम्ही सांगितलं की हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. यावर्षी  मार्गशीर्षमध्ये एकूण ४ गुरुवार येत आहे. पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा २७ नोव्हेंबरला असणार आहे.

धार्मिक महत्त्व

प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हणतात की, या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सदैव लक्ष्मी – नारायणाचा आशीर्वाद मिळतो. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.).


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News