हिंदू धर्माच पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. सर्व देवी-देवता पिंपळाच्या झाडात वास करतात, अशी मान्यता आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात पिंपळाचे झाड खूप शुभ मानले जाते. परंतु घरात पिंपळाचे झाड उगवणं शुभ की अशुभ जाणून घेऊयात…
घरात पिंपळाचं झाड उगवणं शुभ की अशुभ?
वास्तुशास्त्रानुसार घरात पिंपळाचं झाडं उगवणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किंवा घराच्या अगदी जवळ पिंपळाचे झाड लावणे अशुभ मानले जाते. हे झाड सकारात्मक ऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे कुटुंबाच्या समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मानले जाते.

नकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार, जर घराच्या जवळ पिंपळाचे झाड असेल आणि पिंपळाच्या झाडाची सावली घरावर पडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे सुख-शांती भंग होऊ शकते.
आर्थिक अडचणी
पिंपळाचे झाड सकारात्मक ऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे कुटुंबाच्या समृद्धी आणि यशात अडथळे येऊ शकतात असे मानले जाते.











