Hindu Marriage Rituals : लग्नात का बांधल्या जातात मुंडावळ्या आणि बाशिंग? काय आहे कारण

मराठमोळ्या लग्नातील वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधलेली आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लग्नात मुंडावळ्या का बांधतात? जाणून घेऊयात...

लग्न म्हणजे मुंडावळ्या-बाशिंग आलंच. मुंडावळ्या किंवा बाशिंग महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक लग्नात आपल्याला नवरी आणि नवरदेवाच्या कपाळावर बाशिंग बांधलेलं दिसतं. लग्नात नवरा-नवरीला मुंडावळ्या-बाशिंग बांधले जातात. पण का? जाणून घेऊयात…

नजर लागण्यापासून बचाव

लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग बांधण्यामागे मुख्य कारण म्हणजे नजर लागू नये म्हणून वधू-वरांचे संरक्षण करणे आहे. मुंडावळ्या आणि बाशिंगमुळे लोकांचे लक्ष वधू-वरांच्या चेहऱ्यांवरून हटून त्यांच्या डोक्यावरील मुंडावळ्या आणि बाशिंगकडे जाते. यामुळे त्यांना वाईट नजरेपासून वाचवता येते.

एकत्रीकरण आणि अतूट बंधनाचे प्रतीक

लग्नामध्ये मुंडावळ्या आणि बाशिंग बांधल्या जातात कारण त्या वधू आणि वर यांच्या एकत्रीकरणाचे आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहेत.

लग्नाच्या विधींचा अविभाज्य भाग

लग्न समारंभात हे एक महत्त्वाचे आणि पारंपारिक प्रतीक आहे, जे वधू-वरांचे सौंदर्य वाढवते आणि त्यांच्या लुकला पूर्ण करते.  ही प्रथा महाराष्ट्रातील लग्नाच्या विधींचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. 

शास्त्रीय आणि भावनिक कारण

लग्नासारख्या शुभ प्रसंगी वधू-वर भावनिकदृष्ट्या एका वेगळ्याच अवस्थेतून जात असतात, त्यामुळे या गोष्टी त्यांना या तणावातून बाहेर काढण्यास मदत कताअशा स्थितीत डोक्यावर पट्टी बांधल्यासारख्या मुंडावळ्या बांधल्यास डोकं शांत ठेवण्यास मदत मिळते, असं म्हणतात.

लग्नाच्या काळात नवरी आणि नवरदेव दोघांचंही भरपूर जागरण होतं. पुरेशी झोप मिळत नाही. जागरणामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी डोक्याच्या त्या विशिष्ट जागी मुंडावळ्या बांधल्यास त्यांना आराम मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News