Dev Diwali Wishes in Marathi : देव दिवाळीच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा…

देव दिवाळी हा पवित्र सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. देव दिवाळीच्या प्रियजणांना द्या शुभेच्छा.

देव दिवाळी हा पवित्र सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. व दिवाळीच्या दिवशी, भगवान शिव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी घरात दिवे लावणे, दीपदान करणे आणि शक्य असल्यास गंगास्नान करणे शुभ मानले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी खास देव दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत…

कधी आहे देव दिवाळी?

हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा देव दिवाळीचा उत्सव यावर्षी 21 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे.

देव दिवाळीच्या शुभेच्छा..

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
पौर्णिमेच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश…
देव दिवाळीची दिव्यांची आरास
नदीकाठी सजला लख्ख लख्ख प्रकाश…
देव दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पहिला दिवा लागेल दारी
सुखाचा किरण येईल घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

गंगा नदीच्या किनाऱ्यावर या
देव दिवाळीला जसा पवित्र प्रकाश चमकेल,
तसा तुमचा जीवनप्रवासही प्रकाशित होवो,
आनंदमय उत्सव साजरा करा..
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शुभ देव दिवाळीच्या निमित्ताने आनंद,
समृद्धी आणि सुखाची चमक
तुमच्या जीवनात प्रकाशमान होवो.
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

जसे दिवे गंगा नदीचे किनारे उजळवतात,
त्याचप्रमाणे हा दिव्य प्रकाश
तुमच्या यशाच्या मार्गावर मार्गदर्शन करो
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमचे हृदय आणि घर दिव्यतेच्या
उबदारपणाने आणि आशीर्वादांनी भरलेले असो.
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

देव दिवाळीचा हा सण,
तुम्हाला एक ज्ञानमय मार्गावर घेऊन जावो हीच आशा
देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News