Vastu Tips : कासवाची मूर्ती घरात ठेवणे अत्यंत चांगले समजले जाते. अनेक लोक सुख आणि समृद्धीसाठी कासव घरात ठेवतात. कासव घरी ठेवल्याने घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते. तसेच विविध वास्तु दोष दूर होण्यास मदत होते. परंतु घरी कासवाला ठेवण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने ठेवल्यानं पूर्ण फायदे मिळू शकत नाहीत.
योग्य दिशा कोणती (Vastu Tips)
वास्तुशास्त्रानुसार, (Vastu Tips) कासवाच्या मूर्तीला घराच्या उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. असं मानलं जातं की उत्तर दिशा माता लक्ष्मीची आहे. म्हणून, उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, धनलाभ होतो आणि आर्थिक सुख-समृद्धी वाढत जाते. कासवाला उत्तर दिशेला ठेवल्याने तुमच्या शत्रूंचा नाश होतो. दुसरी गोष्ट म्हणजे कासव संपत्तीचे प्रतीक आहे. यामुळे आर्थिक अडचणीतून मुक्तता मिळू शकते आणि तुमची संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल.

नोकरीसाठी फायदेशीर
जर तुम्हाला नोकरीमध्ये किंवा व्यवसायात अडचणीत असेल करिअरमध्ये यश मिळत नसेल तर अशावेळी पितळी कासव तुमचं नशीब बदलून टाकेल आणि यशाचा मार्ग मोकळा होईल.. पितळी कासव विद्यार्थ्यांसाठी देखील खूप शुभ आहे. ते तुमच्या शिक्षणात तुम्हाला फायदेशीर ठरू शकते आणि तुमच्या मेहनतीचे फळ देऊ शकते. घरात पितळी कासव ठेवल्याने सकारात्मक वातावरण राहते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











