Garud Puran : हिंदू धर्मात अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते. गरुड पुराण, मनुस्मृती, पराशर संहिता, धर्मसिंधु, निर्णयसिंधु आणि पद्मपुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये खाण्याचे काही नियम सांगितले आहेत. या नियमानुसार, अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या घरी चुकूनही जेवण करू नये. कारण त्यांचे अन्न खाल्ल्याने तुम्ही आयुष्याची काही पूर्ण केलं आहे ते नष्ट होतं. उलट तुम्ही पापाचे धनी होता. आज आपण जाणून घेऊयात, हे पाच व्यक्ती नेमके आहेत तरी कोण??
पापी माणूस
जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागतो किंवा ज्याने वैयक्तिक फायद्यासाठी कोणाचा जीव घेतला आहे, त्या व्यक्तीच्या घरी जेवण करणे अपवित्र मानले जाते.. गरुड पुराणानुसार अशा चांडाळ व्यक्तीचे अन्न खाल्ल्याने पुढील जन्मात नरक आणि खालच्या जन्माच्या यातना होतात.

भ्रष्ट व्यक्ती (Garud Puran)
जर एखादी व्यक्ती भ्रष्ट असेल, जसे की गोहत्या करणारा किंवा पशुहत्या करणारा, दारू पिणारा, देवांचा किंवा ब्राह्मणांचा अपमान करणारा असेल तर त्यांच्या घरातील अन्न खाल्ल्याने खाणाऱ्याचाbअनादर होतो आणि त्याला चंद्रायण उपवास करणे किंवा गाय दान करणे यासारखे कठोर प्रायश्चित्त करावे लागते. (Garud Puran)
चारित्र्यहीन व्यक्ती
पती किंवा पत्नीशिवाय इतर कोणाशीही शारीरिक संबंध ठेवणाऱ्या कोणत्याही चारित्र्यहीन पुरुष किंवा स्त्रीच्या घरी जेवू नये. पद्मपुराणात असे म्हटले आहे की व्यभिचारी व्यक्तीचे अन्न विषासारखे असते, जे मनाला वासनेने भरते आणि बुद्धीचा नाश करते.
अधर्म करणारा
अधर्म करणारा व्यक्ती म्हणजे तो इतरांना दुखावतो. कोणीही त्याचे अन्न सेवन करू नये. गरुड पुराणानुसार, असे अन्न खाल्ल्याने व्यक्तीची शक्ती आणि आयुर्मान कमी होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











