हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र मानलं जातं. तुळशीची माळ घालताना धर्माचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे, कारण असे मानले जाते की माळ घातल्यानंतर काटेकोर नियमांचे पालन न केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. माळ घालण्यापूर्वी स्नान करून, देवाचे ध्यान करून आणि मंत्रांचा जप करूनच माळ धारण करावी. माळ घातल्यानंतर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखली पाहिजे. अनेक जण तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालतात, मात्र तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर काही नियमांचं पालन करावं लागतं, त्याबद्दल जाणून घेऊयात…
तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे
- तुळशीची माळ घातल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.
- तुळशीची माळ तणाव कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
- सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मकतेपासून बचाव करते.
- सगळ्या प्रकारच्या संकटांपासून मुक्ती देते.
- आर्थिक अडचणी दूर होतात.
माळ घालण्यापूर्वी
- तुळशीची माळ गळ्यात घालायची असेल तर त्यासठी सोमवार, गुरुवार, बुधवार आणि एकादशी हे दिवस खूप शुभ आहेत.
- सकाळी स्नान करून शुद्ध व्हा आणि मगच माळ गळ्यात घाला.
- माळ घालण्यापूर्वी माळेला गंगाजलात धुवून शुद्ध करा.
- माळ गळ्यात घालताना भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा.
तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे नियम काय?
- मांसाहार, कांदा, लसूण आणि दारू यांसारख्या गोष्टींपासून दूर राहा. सात्विक आणि साधा आहार घ्या.
- खोटे बोलणे, फसवणूक करणे टाळा. ब्रह्मचर्य पाळा आणि कोणाशीही शारीरिक संबंध ठेवू नका.
- माळ घातल्यानंतर कोणाबद्दलही वाईट विचार करू नये आणि कोणाचीही निंदा करू नये.
- तुळशीची माळ घातल्यानंतर आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे.
- रविवारी आणि आमावस्याच्या दिवळी तुळशीची माळा घालू नये
- तुळशीची माळ घातल्यानंतर मांस किंवा मद्यपान करू नये.
- माळ गळ्यात असताना, सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
- एकदा गळ्यात घातलेली माळ काढू नये.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












