महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा म्हणते मार्तंड भैरवाची चंपाषष्टीला मोठी यात्रा असते. खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने चंपाषष्टीला घराघरात सुघट आणि तळी भरली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला काही खास पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. हे पदार्थ कोणते आहेत, आणि त्या पदार्थांचे महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊयात…
चंपाषष्टीला वांग्याचे भरीत आणि भाकरी का करतात?
खंडोबाला वांग्याचे भरीत प्रिय असल्याने त्याचा नैवेद्य केला जातो, आणि तीच प्रथा आजही सुरू आहे. षड्ररात्रोत्सव सांगता ही मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला होते आणि त्याला चंपाचष्ठी असं म्हणतात. त्यामुळे मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाला या दिवशी आवडीचा नैवेद्य केला जातो. खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो, ज्यामध्ये सुघट केला जातो, तळी भरली जाते, खंडोबाचे वाहन असलेल्या श्वानालाही नैवेद्य दाखविला जातो.

चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचे महत्त्व
चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरी नैवेद्य म्हणून दाखवतात कारण हा खंडोबाचा आवडता प्रसाद आहे. चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी. या दिवशी खंडोबाने मणी-मल्ल या राक्षसांचा वध केला होता, हे सर्वसामान्य लोकांना संकटातून मुक्त केल्याचे प्रतीक आहे. या विजयाचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी घराघरात वांग्याचे भरीत आणि भाकरीचा खास बेत करून तो नैवेद्य म्हणून खंडेरायाला अर्पण केला जातो आणि नंतर प्रसाद म्हणून वाटला जातो. चातुर्मासात वांगी न खाण्याची परंपरा असल्यामुळे, चंपाषष्ठीपासून पुन्हा वांगी खाण्यास सुरुवात केली जाते. त्यामुळे या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी करण्याचा विशेष उत्साह असतो. हा नैवेद्य खंडोबाच्या पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, नवा कांदा, दही भात, गाजर आणि लिंबू यांचा समावेश असतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











