Sunny Leone Poster In Farm : काय सांगता!! शेतकऱ्याने शेतात उभारला सनी लियोनीचा बॅनर; कारण वाचून दंग व्हाल

शेतकऱ्याला असे वाटते की, रस्त्याने जाणारे लोक त्याच्या पिकाकडे पाहतात त्यामुळे पिकाला नजर लागते, मात्र या सनीच्या फोटोमुळे लोक फोटोकडे पाहतील आणि पिकाकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे पिकाला नजर लागणार नाही.

Sunny Leone Poster In Farm । मित्रानो, शेतात आपल्या पिकाचे रक्षण व्हावे आणि पशु पक्षांकडून शेतातील पिकाचे नुकसान होऊ नये,  यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या उपाययोजना करत असतो. अनेकदा तो शेतामध्ये माणसांसारख्या दिसणारे पुतळे लावतो. काठीला मडके लावून ते उभे करतानाही तुम्ही बघितलं असेल… परंतु एका शेतकऱ्याने आपल्या शेताला कोणाची नजर लागू नये म्हणून चक्क बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी चा बॅनर शेतात उभारला आहे. या अनोख्या बॅनरची चर्चा सध्या संपूर्ण देशात रंगली आहे.

कुठे घडला प्रकार (Sunny Leone Poster In Farm)

आम्ही तुम्हाला ज्या शेतकऱ्यांबद्दल सांगतोय तो शेतकरी कर्नाटकातील यादगिर जिल्ह्यातील मुदानूर या गावातील आहे. या शेतकऱ्याने त्याच्या शेतात कापसाची लागवड केली आहे. आपल्या कापसाच्या पिकाला नजर लागू नये म्हणून शेतकऱ्याने सनी लियोनीचा फोटो लावला आहे. शेतकऱ्याला असे वाटते की, रस्त्याने जाणारे लोक त्याच्या पिकाकडे पाहतात त्यामुळे पिकाला नजर लागते, मात्र या सनीच्या फोटोमुळे लोक फोटोकडे पाहतील आणि पिकाकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे पिकाला नजर लागणार नाही. शेतकऱ्याची हि अनोखी कल्पना संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. Sunny Leone Poster In Farm

कोण आहे सनी लियोनी?

सनी लियोनी हि बॉलीवूड मधील प्रसिद्ध आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एकेकाळी पॉर्न स्टार असलेल्या सनी लियोनीने बॉलीवूड चित्रपटातही दमदार कामगिरी करत चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतलं आहे.  बिग बॉस” या रिॲलिटी मालिकेत सहभागी झाल्यानंतर ती प्रसिद्ध झाली. जिस्म २’ (2012) या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर सनी लिओनी ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनीच्या मनमोहक अदांचे आजही करोडो चाहते आहेत.  इंस्टाग्राम असो वा इतर शोषल मीडिया प्लॅटफॉर्म, सनीची जादू सगळीकडेच बघायला मिळतेय.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News