Kapil Sharma : कपिल शर्माचा जीव धोक्यात? दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा

कॉमेडी जगतातील आघाडीचे नाव कपिल शर्मा यांच्याबाबत एका गंभीर कटाचा पर्दाफाश झाला आहे. कॅनडातील सरे येथे त्यांच्या *Kap’s Café* वर झालेल्या तिहेरी गोळीबारानंतर दिल्ली पोलिसांनी तपासाची दिशा बदलली

Kapil Sharma : कॉमेडी जगतातील आघाडीचे नाव कपिल शर्मा यांच्याबाबत एका गंभीर कटाचा पर्दाफाश झाला आहे. कॅनडातील सरे येथे त्यांच्या *Kap’s Café* वर झालेल्या तिहेरी गोळीबारानंतर दिल्ली पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अखेर लुधियानातून कुख्यात गुन्हेगार बंधु मान सिंग सेखोंला अटक करण्यात आली. चौकशीत पोलिसांना समजले की कपिलवर एका साइलेंट किलिंगची मोठी योजना रचली गेली होती.

कोण आहे सिंग सेखों (Kapil Sharma)

सेखों हा फक्त स्थानिक गुंड नसून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेटचा भाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तो ISI ऑपरेटिव हॅरी चठा आणि जगभरातील हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या गोल्डी ढिल्लोंचा विश्वासू साथीदार आहे. याच टोळीने कपिल शर्मा यांना लक्ष्य करण्याचे ठरवले होते, कारण त्यांच्याकडून मोठ्या रकमेची फिरौती मागण्यात आली होती. अपेक्षेनुसार पैसे न मिळाल्यास कपिलची हत्या करण्याची योजना तयार होती, असे सेखोंने कबूल केले.

CCTV फुटेजमुळे अडचणीत

सुरुवातीला कपिलच्या कॅफेवरील हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा करणारा सेखों पोलिसांनी मिळवलेल्या CCTV फुटेजमुळे अडचणीत आला. फुटेजमध्ये तो शूटरांसह कारच्या पुढील सीटवर बसलेला दिसला आणि त्यानंतर त्याची भूमिका उघड झाली. तपासात असेही समोर आले की हल्ला करणारे दलजोत रेहल आणि गुरजोत हे सेखोंचेच दोन शूटर होते. दोघांनी बॉडी कॅमेरा लावून हल्ला केला आणि नंतर ते फुटेज सोशल मीडिया तसेच डार्क वेबवर शेअर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकरणामुळे पंजाबी मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. कपिल शर्मा यांच्या सुरक्षेबाबतही अतिरिक्त उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाची पुढील चौकशी वेगाने करत आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News