वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर कसे असावे? कोणती वस्तू कुठे ठेवावी? हे जाणून घ्या

Asavari Khedekar Burumbadkar
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घराच्या बांधकामापासून ते घरात कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी, या सर्व गोष्टींचे वास्तुशास्त्रात वर्णन केले आहे. वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने घरात नेहमीच सुख-समृद्धी राहते. जेव्हा जेव्हा नवीन घर बांधले जाते तेव्हा लोक वास्तुशास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन करतात. घरात स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम, आणि बाल्कनी कोणत्या दिशेला असावी हे वास्तुशास्त्र सांगते.

आज आपण स्वयंपाकघराबद्दल जाणून घेऊ. स्वयंपाकघर हा संपूर्ण घराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. आज आपण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे आणि स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे जाणून घेऊया….

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला नसावे?

घरात स्वयंपाकघराची जागा खूप महत्त्वाची असते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर दक्षिण दिशेला बांधू नये. असे केल्याने वास्तुदोष होऊ शकतो, ज्यामुळे जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. दक्षिण दिशा ही यम दिशा मानली जाते, वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा नकारात्मक ऊर्जा आणि मृत्युशी संबंधित आहे. दक्षिण-पश्चिम दिशा ‘मृत्यु’ आणि ‘अन्न’ यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे या दिशेला स्वयंपाकघर असणे चांगले मानले जात नाही. येथे स्वयंपाकघर असल्यास, घरातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात किंवा आर्थिक अडचणी येऊ शकतात.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला सावे?

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) असावे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी टिकून राहते. गॅस स्टोव्ह आग्नेय दिशेला ठेवावा आणि स्वयंपाक करताना व्यक्तीचा चेहरा पूर्वेकडे असावा.

भांडी कोणत्या दिशेला ठेवावीत?

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय कोण म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशेत असणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील भांडी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.  वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात भांडी ठेवताना योग्य दिशा निवडणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या किंवा खराब झालेल्या भांड्यांचा वापर करणे अशुभ मानले जाते, त्यामुळे त्याऐवजी नवीन आणि चांगल्या स्थितीत असलेल्या भांड्यांचा वापर करणे चांगले. 

खिडकी कोणत्या दिशेला असावी?

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील खिडकीची दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. योग्य दिशा निवडल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वास्तुदोष दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला असणे शुभ मानले जाते. स्वयंपाकघरातील खिडकी पूर्व दिशेला असणे उत्तम मानले जाते. योग्य दिशा निवडल्यास स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. चुकीच्या दिशेला खिडकी असल्यास वास्तुदोष येऊ शकतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करणे शुभ मानले जाते, तर दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणे टाळावे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या