Sankashti Chaturthi 2025 : “सुखकर्ता दुःखहर्ता” समर्थांनी रचलेली गणपतीची संपूर्ण आरती

आरती करताना स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसून, गणपतीच्या मूर्तीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. त्यानंतर गणपतीला प्रिय असलेले नैवेद्य (मोदक) अर्पण करावेत.

आपल्या हिंदू धर्मात देवाची पूजा केली जाते. तसेच प्रत्येकाच्या घरी देवघर असते आणि रोज सकाळी देवाची पूजा करून आरती म्हटली जाते. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते.आरतीचा अर्थ ‘प्रकाश अर्पण करणे’ असा होतो आणि ती गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी केली जाते. गणपतीला ‘अडथळे दूर करणारा’ आणि ‘बुद्धीचा देव’ मानले जाते, म्हणून कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला त्यांची पूजा केली जाते. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही गणपतीची आरती समर्थ रामदासांनी लिहिली आहे. तर वाचा ही समर्थरचित गणपतीची संपूर्ण आरती…

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ आरतीचे महत्त्व

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती समर्थ रामदास स्वामींनी रचली असून, ती गणपतीला उद्देशून आहे. ही आरती पूजा आणि उत्सवाच्या शेवटी म्हणली जाते, जी मनाला सकारात्मकता देते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते. ही आरती भक्तिभावाने आणि अर्थ समजून म्हटल्यास, आध्यात्मिक ज्ञान आणि दिव्य आनंद मिळतो.

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया॥२॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ 3 ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

!!गणपती बाप्पा मोरया!!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News