Sankashti Chaturthi 2025 : गणपतीला ‘मोरया’ का म्हणतात? जाणून घ्या त्यामागील लोकप्रिय कथा…

मोरया गोसावी हे गणपतीचे परम भक्त होते आणि त्यांची भक्ती इतकी खोल होती की गणपतीने त्यांना दर्शन देऊन सिध्दी (आध्यात्मिक शक्ती) दिली आणि ते त्यांच्या आत्म्यात विलीन झाले असे मानले जाते.

गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे. बुद्धीदाता, विघ्नहर्ता, सुखदाता गणपती बाप्पाला अनेक नावांनी ओळखले जाते आणि त्याच्या अनेक कथाही प्रचलित आहे. गणपती बाप्पा आणताना, गणेशाची आरती करताना आपण शेवटी गणपती बाप्पा मोरया म्हणतो. तर जयजयकार करताना मोरयाच का म्हणतो जाणून घेऊया…

संकष्टी चतुर्थी तिथी 

वैदिक पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती 9  नोव्हेंबर रोजी सकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी होईल. त्यामुळे, उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 8 नोव्हेंबर रोजी केले जाईल.

मोरया गोसावी आणि गणपतीची कथा

गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे ६०० वर्ष जुनी कथा आहे. गणपतीला ‘मोरया’ म्हणण्यामागे १४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी यांची कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. १३७५ मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. असं सांगितले जातं  की, वयाच्या ११७ वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु नंतर वयपरत्वे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून, ते दुःखी असत. तेव्हा एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की, उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन.

दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणेशाने त्यांना दर्शन दिलं. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं. गणपतीसोबत इथे मोरया गोसावी यांचं नाव अशाप्रकारे जोडलं गेलं की, गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरया असं तिथले लोक बोलू लागले. तेव्हापासून, गणपतीच्या जयघोषात ‘मोरया’ हा शब्द जोडला गेला आणि ही परंपरा देशभरात पोहोचली. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News