Annapurna Jayanti 2025 : अन्नपूर्णा जयंती! अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व आणि पूजा पद्धत

Asavari Khedekar Burumbadkar

अन्नपूर्णा जयंती या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि कुटुंबातील दुःख दूर होतात. ही जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते आणि या दिवशी अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व

या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे देवी प्रसन्न होते आणि अन्नपूर्णा देवीची कृपा प्राप्त होते. अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचा एक अवतार आहे, जी जगाला अन्न आणि पोषण प्रदान करते. अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि देवीची आराधना करतात. अन्नपूर्णा देवीचे मंदिर काशिविश्वनाथ मंदिराजवळ आहे. पूजा झाल्यानंतर या दिवशी अन्नदान करावे. अन्नदान केल्याने घरामध्ये धन आणि समृद्धीने भरते. 

पूजा पद्धत

  • सकाळी लवकर उठून स्नान करा आणि पूजा करण्याचा संकल्प घ्या.
  • स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्या आणि गंगाजल शिंपडून शुद्ध करा.
  • स्वयंपाकाच्या जागेजवळ देवी अन्नपूर्णांचे चित्र किंवा मूर्ती ठेवा.
  • चुलीवर कुंकूने स्वस्तिक काढा.
  • हातात पाणी आणि तांदूळ घेऊन देवीला कुंकूचा टिळा लावा.
  • देवीच्या प्रतिमेला हार अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा.
  • अबीर, गुलाल, अक्षता इत्यादी अर्पण करा आणि चुलीचीही पूजा करा.
  • तुमच्या आवडीचा आणि श्रद्धेनुसार पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.
  • आरती करा आणि दानधर्म करा. गरजू लोकांना धान्य किंवा शिजवलेले अन्न दान करणे शुभ मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या