Champa Shashti 2025 : चंपाषष्ठी ‘हे’ नाव कसे पडले? वाचा यामागील कथा..

Asavari Khedekar Burumbadkar

चंपाषष्ठी हे भगवान खंडोबा किंवा मार्तंड भैरवाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. या दिवशी, खंडोबाने मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध केला होता, ज्याचे स्मरण म्हणून षष्ठी तिथीला हा उत्सव साजरा करतात. या उत्सवामध्ये सहा दिवस पूजा केली जाते, ज्यामध्ये वांग्याचे भरीत आणि भाकरी नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.

चंपाषष्ठी कधी आहे?

पंचांगानुसार, मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी म्हणजेच चंपषष्ठी तिथी 25 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी सुरू होईल. आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 12 वाजून 01 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, चंपाषष्ठी 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी होईल.

चंपाषष्ठी ‘हे’ नाव कसे पडले?

भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार घेऊन मणी-मल्ल या दैत्यांशी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला युद्ध केले आणि त्यांना पराभूत केले. हे युद्ध चंपक वनात झाले, त्यामुळे या दिवसाला ‘चंपाषष्ठी’ असे म्हणतात. दैत्यांचा वध केल्यानंतर विजयाच्या आनंदात देवांनी चंपक वनात चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला, म्हणजेच ‘चंपा वृष्टी’ झाली. यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव मिळाले. मणी-मल्ल या दैत्यांचा वध केल्यामुळे शंकराला ‘मल्लारी’ (मल्ल दैत्याचा शत्रू) आणि ‘खंडोबा’ ही नावे पडली. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या