Dev Diwali 2025 : देवदिवाळी साजरी करण्याच्या कोकणातील काही परंपरा

यंदा 21 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला कोकणात “देवदिवाळी” साजरी केली जाते. जी देवतांसाठी खास दिवाळी मानली जाते.

यंदा 21 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला कोकणात “देवदिवाळी” साजरी केली जाते. जी देवतांसाठी खास दिवाळी मानली जाते. या दिवशी कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता आदी सर्व देवांना अभिषेक करून नैवेद्य अर्पण केला जातो.  हा सण घरातील देवदेवतांना आणि स्थानिक देवतांना एकत्र मान देतो. कोकणातील घराघरांत देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. 

देव दिवाळी का साजरी केली जाते?

जेव्हा अश्विन-कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो, तेव्हा चार्तुमास सुरू असतो. यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. यानंतर  कार्तिक एकादशी ला भगवान विष्णूना जाग येते आणि ते विश्वाप्रती त्यांचे असलेले कर्तव्य निभावण्यास पुन्हा सज्ज होतात. त्यामुळे मार्गशीर्षात देवतांसाठी खास ‘देवांची दिवाळी’ म्हणून हा सण साजरा केला जातो.  

कोकणातील देवदिवाळीतील विधी

कोकणात देवदिवाळी साजरी करताना घराच्या कुलदेवता, ग्रामदेवता आणि वास्तुदेवतेची पूजा केली जाते, ज्यामध्ये अभिषेक करणे आणि नैवेद्य दाखवणे यांचा समावेश असतो. घराला दिवे लावून प्रकाशित केले जाते आणि काही ठिकाणी बळीराजाचे स्मरण करून विडे ठेवले जातात.

देवदिवाळी साजरी करण्याच्या कोकणातील काही परंपरा

  • कोकणात देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, ज्यात अनेक अनोख्या परंपरा आहेत. यांपैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे पान विडे भरण्याची परंपरा.
  • देवदिवाळीला बळीराजाचे स्मरण म्हणून पान विडे भरण्याची कोकणात अनोखी परंपरा आहे. बळीराजा हा कृषीप्रधान आणि गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा मानला जातो.
  • कोकणात देवदिवाळीला विविध देवतांची पूजा केली जाते. यात गवळ देव (गुराख्यांचा देव) आणि ग्रामदैवतांची भजनेही केली जातात.
  • कोकणात, देवदिवाळीच्या दिवशी काही ठिकाणी वाघ पिटाळणे हा विधी केला जातो.
  • या दिवशी अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो, असे मानले जाते. 

कोकणातील देव दिवाळी पूजा पद्धत

  • देव दिवाळीच्या दिवशी घरासमोर आणि अंगणात पणत्या लावल्या जातात. तसेच, खास तयार केलेले आकाशकंदील लावण्याची पद्धत अजूनही अनेक ठिकाणी पाळली जाते.
  • देव दिवाळीच्या दिवशी अनेक कोकणी कुटुंबांमध्ये लक्ष्मी आणि कुलदेवता किंवा ग्रामदेवता यांची पूजा केली जाते.
  • या दिवशी विशेष पदार्थ, जसे की घावन-घाटले, यांचा नैवेद्य दाखवला जातो.
  • काही ठिकाणी खंडोबाच्या देवस्थानांमध्ये देवदीपावलीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. 
  • देव दिवाळीच्या दिवशी देव पृथ्वीवर अवतरून दिवाळी साजरी करतात असे मानले जाते, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News