हिंदू धर्मात प्रत्येक कार्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस ठरवलेले आहेत. अगदी केस कापण्यापासून ते नखं काढण्यापर्यंत देखील शास्त्रानुसार योग्य वेळ निश्चित केली जाते. काही लोक नखं कधीही कापतात, परंतु शास्त्रांमध्ये त्यासाठी विशिष्ट नियम आहेत. योग्य वेळी नखं काढल्याने शुभ परिणाम मिळतात, तर चुकीच्या वेळी नखं काढल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊयात कोणत्या दिवशी कापू नये नखे?
संध्याकाळी नखे कापू नये
सूर्यास्तानंतर नखं कापणे टाळावे, कारण यामुळे वाईट शक्ती आकर्षित होतात आणि दुर्दैव येऊ शकते असे मानले जाते.

कोणत्या दिवशी कापू नये नखे?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार, गुरुवार आणि मंगळवारच्या दिवशी नखे कापणे टाळावे.
- शनिवार हा शनिदेवाचा वार असल्याने नखे कापल्याने शनिदेवाला कोप येतो, ज्यामुळे आरोग्य आणि आर्थिक हानी होऊ शकते.
- गुरुवार हा वार गुरु ग्रहाशी संबंधित आहे, जो ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नखे कापल्यास गुरु ग्रहाचे अशुभ परिणाम भोगावे लागतात आणि बुद्धी मंदावते असे मानले जाते.
- मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे. या दिवशी नखे कापल्यास अपयश आणि आरोग्यविषयक त्रास होऊ शकतात.
-
रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे, जो आत्मा, आरोग्य आणि सन्मानाचा ग्रह मानला जातो. या दिवशी नखे कापणे अशुभ मानले जाते.
कधी कापू शकता?
- सोमवार : भगवान शिव आणि चंद्र यांच्याशी संबंधित असल्याने नखं कापण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
- बुधवार : शास्त्रानुसार हा दिवस नखं, केस कापणे आणि दाढी करण्यासाठी शुभ आहे.
- शुक्रवार : नखं कापण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)