शुक्रवारी शुक्र स्तोत्राचे पठण केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. यासाठी सकाळी स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावे, देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि पांढऱ्या आसनावर बसून स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राच्या पठणाने धन-ऐश्वर्य, सुख आणि वैभवात वाढ होते.
शुक्र स्तोत्र पठणाचे महत्व
शुक्रवारी शुक्र स्तोत्राचे पठण केल्याने शुक्र ग्रहाची कुंडलीतील स्थिती सुधारते. शुक्र दोष दूर करण्यासाठी आणि शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हे पठण फायदेशीर ठरते. शुक्र स्तोत्राच्या पठणाने जीवनात ऐश्वर्य आणि समृद्धी येते, असे मानले जाते. या पठणामुळे धनलाभ होण्यास मदत होते आणि पैसा मिळण्यास मार्ग मोकळे होतात. शुक्राचा प्रभाव वाढल्याने सौंदर्यात भर पडते आणि व्यक्ती अधिक आकर्षक वाटते.

पठण करण्याची योग्य पद्धत
- स्नानानंतर स्वच्छ होऊन पांढरे वस्त्र परिधान करा.
- लक्ष्मी आणि शुक्राच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसा.
- प्रथम लक्ष्मी आणि शुक्राचे आवाहन करा.
- शुक्र स्तोत्राचे पठण सुरू करा.
- हे पठण दर शुक्रवारी केल्यास अधिक लाभ होतो.
शुक्र स्तोत्र
नमस्ते भार्गव श्रेष्ठ देव दानव पूजित।
वृष्टिरोधप्रकर्त्रे च वृष्टिकर्त्रे नमो नम:।।
देवयानीपितस्तुभ्यं वेदवेदांगपारग:।
परेण तपसा शुद्ध शंकरो लोकशंकर:।।
प्राप्तो विद्यां जीवनाख्यां तस्मै शुक्रात्मने नम:।
नमस्तस्मै भगवते भृगुपुत्राय वेधसे।।
तारामण्डलमध्यस्थ स्वभासा भसिताम्बर:।
यस्योदये जगत्सर्वं मंगलार्हं भवेदिह।।
अस्तं याते ह्यरिष्टं स्यात्तस्मै मंगलरूपिणे।
त्रिपुरावासिनो दैत्यान शिवबाणप्रपीडितान।।
विद्यया जीवयच्छुक्रो नमस्ते भृगुनन्दन।
ययातिगुरवे तुभ्यं नमस्ते कविनन्दन।।
बलिराज्यप्रदो जीवस्तस्मै जीवात्मने नम:।
भार्गवाय नमस्तुभ्यं पूर्वं गीर्वाणवन्दितम।।
जीवपुत्राय यो विद्यां प्रादात्तस्मै नमोनम:।
नम: शुक्राय काव्याय भृगुपुत्राय धीमहि।।
नम: कारणरूपाय नमस्ते कारणात्मने।
स्तवराजमिदं पुण्य़ं भार्गवस्य महात्मन:।।
य: पठेच्छुणुयाद वापि लभते वांछित फलम।
पुत्रकामो लभेत्पुत्रान श्रीकामो लभते श्रियम।।
राज्यकामो लभेद्राज्यं स्त्रीकाम: स्त्रियमुत्तमाम।
भृगुवारे प्रयत्नेन पठितव्यं सामहितै:।।
अन्यवारे तु होरायां पूजयेद भृगुनन्दनम।
रोगार्तो मुच्यते रोगाद भयार्तो मुच्यते भयात।।
यद्यत्प्रार्थयते वस्तु तत्तत्प्राप्नोति सर्वदा।
प्रात: काले प्रकर्तव्या भृगुपूजा प्रयत्नत:।।
सर्वपापविनिर्मुक्त: प्राप्नुयाच्छिवसन्निधि:।।
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)