आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल. काही लोक फॅशनसाठी घालतात तर काही वास्तुशास्त्रानुसार घालतात. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात कासवाची अंगठी बोटात घालणे शुभ मानले जाते. मात्र ती परिधान करताना योग्य काळजी घेणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे. कोणते आहेत ते नियम जाणून घ्या…
कासवाची अंगठी घालण्याचे नियम
शुभ दिवस
शुक्रवार हा कासवाची अंगठी घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो, कारण हा दिवस धन आणि समृद्धीची देवता असलेल्या देवी लक्ष्मीला समर्पित आहे. कासव हा देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो आणि त्याच्या अंगठीमुळे घरात धन-समृद्धी येते, असे मानले जाते. जर अंगठी काढायची असेल आणि परत घालायची असेल, तर लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतरच पुन्हा घाला.

योग्य बोट
कासवाची अंगठी शक्यतो अंगठ्याच्या बाजूच्या बोटात म्हणजेच मधल्या बोटात घालावी, कारण हे बोट शनी आणि बुधाशी संबंधित आहे. हे अंगठीला योग्य संतुलन देते.
अंगठीची दिशा
कासवाची अंगठी घालताना ती मधल्या बोटात घालावी आणि अंगठीवरचे कासव तुमच्या दिशेने असावे, जेणेकरून तुमच्याकडे धन आणि समृद्धी येईल. अंगठी घालण्यासाठी शुक्रवार हा शुभ दिवस मानला जातो.
धातू
अंगठी ही चांदी, तांबे किंवा सोन्यासारख्या धातूपासून बनवलेली असावी. ही अंगठी चांदीमध्ये असणे सर्वोत्तम मानले जाते.
कासवाची अंगठी घालण्याचे फायदे
- कासव हे विष्णू देवाचा अवतार मानले जाते आणि ते धनसंपत्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे ही अंगठी सकारात्मक प्रभाव आणते असे मानले जाते.
- कासवाच्या स्थिर स्वभावाप्रमाणेच, या अंगठीमुळे घरात शांती आणि संतुलन राखण्यास मदत होते.
- कासवाची अंगठी धारण केल्याने मानसिक शांतता, संयम आणि आत्म-नियंत्रण सुधारते.
- या अंगठीमुळे धनलाभ होतो. आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती आकर्षित होते.
- या अंगठीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)