Naivedya : कोणत्या देवाला कोणता नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या…

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मामध्ये ईश्वरचरणी नैवेद्यअर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. देवासमोर ठेवलेल्या नैवेद्याला आपण प्रसाद म्हणतो. नैवेद्याचा शाब्दिक अर्थ म्हणजे भगवंताला अर्पण केलेलं पवित्र भोजन. देवाला अर्पित केल्यानंतर जेव्हा भक्तगण ते ग्रहण करतात तेव्हा आपण त्याला प्रसाद म्हणतात. प्रत्येक देवाला विशिष्ट नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊयात कोणत्या देवाला कोणता नैवेद्य दाखवावा…

महादेवाला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य

महादेवाला दूध, दही, मध अर्पण करावे. यामुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. महादेवाला पांढऱ्या रंगाच्या मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवावा.

गणपती बाप्पाला दाखवा या पदार्थांचा नैवेद्य

गणपती बाप्पाला मोदक, पुरणपोळी, लाडू, श्रीखंड आणि वरण-भात यांसारखे नैवेद्य अर्पण केले जातात. या पारंपरिक पदार्थांव्यतिरिक्त, खीर आणि आम्रखंड यांसारखे गोड पदार्थ देखील गणपतीला प्रिय आहेत.

श्री विष्णूंचा नैवेद्य

श्री विष्णूंना खीर, रव्याचा शिरा किंवा नारळ यांसारखे पदार्थ अर्पण करतात, ज्यामध्ये तुळशीची पाने घालणे महत्त्वाचे आहे.

हनुमंताचा नैवेद्य

हनुमानजींना बुंदी खूप आवडते. शुद्ध तुपाने बनवलेले बेसन लाडूही हनुमानजींना आवडतात.अशा स्थितीत मंगळवारी हनुमानजींना बुंदी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. कारण मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

श्री लक्ष्मीचा नैवेद्य

लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. तांदूळ, दूध, साखर, केशर, किशमिश, चारोळी, मखाणे आणि काजू घालून बनवलेली खीर देवीला अर्पण करावी. लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी मिठाई खूप आवडते.

दुर्गेचा नैवेद्य

दुर्गामाता शक्तीची देवी मानली जाते. दुर्गामातेला खीर, मालपुआ, केळी, नारळ, भात आणि मिठाई खूप आवडते.

सरस्वतीचा नैवेद्य

देवी सरस्वतीला केसरी शिरा, पिवळे लाडू (बुंदी, मोतीचूर), पिवळा भात आणि सुका मेवा (बदाम, काजू, मनुका) यांसारखे पिवळे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. यासोबतच, तिला पिवळी फुले आणि चंपाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते.

श्री कृष्णाचा नैवेद्य

श्री कृष्णाला माखन-मिश्री, लोणी, दही, दूध आणि साजूक तूप यांसारखे गोड पदार्थ अर्पण करावेत.
नैवेद्याच्या भांड्यावर तुळशीपत्र ठेवूनच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा. यामुळे तो पूर्णपणे देवाला समर्पित होतो, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या