बुधवारचा दिवस गणेशाला समर्पित केला जातो. गणेश हा बुद्धीचा देव आहे. तसेच, गणपतीला ‘विघ्नहर्ता’ मानले जाते, जे सर्व अडथळे दूर करतात आणि त्यांच्या पूजनाने भक्तांच्या समस्या कमी होतात, अशी श्रद्धा आहे. पण गणपती बाप्पाला बुधवारचा दिवस का समर्पित केला जातो? जाणून घेऊयात….
बुधवार गणपती बाप्पाला का समर्पित आहे?
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट देवतेला समर्पित केले आहे. बुधवार हा गणपतीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेल्या गणपतीच्या पूजेमुळे ते लवकर प्रसन्न होतात. गणपतीला ‘विघ्नहर्ता’ म्हणजे संकटांवर मात करणारा देव मानले जाते. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. बुधवारी गणपतीची पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात आणि कामे यशस्वी होतात, अशी श्रद्धा आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवारचा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे. हा ग्रह बुद्धिमत्ता, बुद्धी आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. बुद्धीचा देव असलेल्या गणपतीची पूजा बुधवारी केल्याने या गोष्टींमध्ये प्रगती होते असे मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे त्यांनी बुधवारी भगवान गणेशाची पूजा करावी.
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा माता पार्वती यांच्या आशीर्वादाने गणरायाचा जन्म झाला. तेव्हा कैलास पर्वतावर बुध देव देखील उपस्थित होते. त्यांची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जाते. म्हणून बुधवारी गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी पूजा केल्याने गणपतीची कृपा लाभते आणि जीवनातील संकटे दूर होतात, असे मानले जाते.
बुधवारच्या पूजेचे महत्त्व
बुधवारचा दिवस गणपतीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी केलेल्या पूजेने तो प्रसन्न होतो. या दिवशी केलेल्या विधीवत पूजेमुळे गणपतीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे सर्व संकटे दूर होऊन सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि ज्ञान लाभते. शास्त्रानुसार, बुधवारी गणपतीचे व्रत करणे देखील शुभ मानले जाते. व्रत कथेचे वाचन करणे महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











