Vivah Panchami 2025 : विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते? जाणून घ्या कारण

Asavari Khedekar Burumbadkar

विवाह पंचमी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला. त्याला श्री राम विवाह उत्सव असेही म्हणतात यावर्षी विवाह पंचमी  25 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल.

केळीचे झाड का मानले जाते शुभ?

केळीचे झाड भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या झाडाला समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात धन-समृद्धी येते. केळीच्या झाडात देवगुरु बृहस्पतींचा वास असतो. त्यामुळे गुरु ग्रहाशी संबंधित समस्या दूर होतात आणि शुभ फल मिळते. शुभ कार्यांमध्ये, जसे की लग्न, सत्यनारायण पूजा, केळीच्या पानांचा आणि झाडांचा वापर सजावटीसाठी केला जातो, कारण ते पवित्र मानले जातात. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरु ग्रह मजबूत होतो, कारण गुरुवार हा देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. ज्यांच्या कुंडलीत गुरु ग्रह अशुभ स्थानावर आहे आणि त्यामुळे लग्नात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी केळीच्या झाडाची पूजा करणे फायदेशीर ठरते.

विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते?

विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते कारण केळीचे झाड हे भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यात समृद्धी आणि शुभतेचे वास आहे. या पूजेमुळे वैवाहिक जीवनात आनंद, समृद्धी येते आणि लग्नातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि बृहस्पती प्रसन्न होतात, ज्यामुळे गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि विवाहिक संबंधात येणाऱ्या अडचणी कमी होतात. आणि घरात सुख-समृद्धी नांदते. केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते. 

केळीच्या झाडाची पूजा करण्याचा विधी

  • विवाह पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • केळीच्या झाडाभोवती पिवळे वस्त्र गुंडाळा किंवा पिवळे धागे बांधा, ज्यामुळे वैवाहिक सुसंवाद आणि समृद्धी येईल
  • धूप आणि तुपाचा दिवा लावा आणि श्रीरामाच्या मंत्राचा जप करा.
  • श्रीराम हे भगवान विष्णूंचे रूप आहे म्हणून केळीच्या झाडाची पूजा करताना लक्ष्मीनारायणाचे ध्यान करा.
  • ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा शक्य तितक्या वेळा जप करा.
  • यानंतर अक्षदा, पंचामृत, सुपारी, दिवा अशा वस्तू अर्पण करा.
  • यानंतर केळीच्या झाडाची 21 वेळा प्रदक्षिणा करा,
  • भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद मागून प्रार्थना करा.
  • या पूजेमुळे वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या