घरात भांडणे होणे सामान्य आहे; ते प्रत्येकाच्या घरात घडतात. पण जर हे दररोज आणि सतत घडत राहिले तर त्याचा त्रास होऊ लागतो. घरात सतत भांडणे होत असतील, तर वास्तुदोषामुळे हे होऊ शकते. घरात दररोज आणि सतत भांडणे होत असतील, तर आज आम्ही तुम्हाला त्यापासून मुक्त होण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की, भांडणे आणि घरगुती कलह यांचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. घरात शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी काही सोप्या वास्तु टिप्स जाणून घेऊया…
कापूर जाळा
घरात सतत भांडणे होत असतील, तर वास्तुदोषामुळे हे होऊ शकते. घरात शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पितळेच्या भांड्यात कापूर जाळून तो घरभर फिरवा. यामुळे घरात सुख-शांती येते. तसेच कापसाच्या धाग्यात कापूर बांधून घरात फिरवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

घर स्वच्छ ठेवा
घरात अनावश्यक वस्तू आणि कचरा साठवून ठेवू नये, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. अस्वच्छ घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे भांडणे होऊ शकतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही.
हळदीचे पाणी
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हळदीचे पाणी उपयुक्त ठरते.
तुळस
तुळस घराच्या पूर्व दिशेला लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशीची पूजा केल्याने घरात शांती आणि समृद्धी येते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करा आणि तुळशीसमोर दिवा लावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)