‘या’ गोष्टी चुकूनही फ्रीजवर ठेवू नका, यामुळे घरात येईल नकारात्मकता

घरी लोक स्वयंपाकघरात फ्रिज ठेवतात. हे एक असे मशीन आहे ज्यामध्ये तुम्ही अनेक दिवस वस्तू ठेवू शकता. साधारणपणे, प्रत्येक घरात फ्रिज दिसतो. फ्रिज स्वयंपाकघराचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी फ्रिजच्या वर ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता येते. त्यामुळे कोणत्या वस्तू फ्रिजवर ठेवणं टाळलं पाहिजे जाणून घेऊ…

सोने, चांदी आणि पैसे

काही लोक फ्रिजच्या वर पैसे ठेवतात, जे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. वास्तुशास्त्रातील नियमानुसार, रोख रक्कम, नाणी किंवा सोने-चांदीच्या वस्तू कधीही फ्रिजवर ठेवू नयेत. यामुळे धनहानी होऊ शकते आणि देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. जर तुम्हालाही या सवयीचे व्यसन असेल तर त्यामुळे पैशाचे नुकसान होते. आर्थिक अडचणी कायम राहतात, म्हणून चुकूनही फ्रिजवर पैसे ठेवू नयेत.

बुके, बास प्लांट

बरेच लोक फ्रिजच्या वरती बुके, बास प्लांट ठेवतात. यामुळे घरात नकारात्मकता येते. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.

औषधे

बरेच लोक औषधे फ्रिज वर ठेवतात, चुकूनही औषधे फ्रिजवर ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. फ्रिजमधून निघणारी उष्णता औषधांचा प्रभाव नष्ट करते, म्हणून औषधे नेहमी कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा.

रोप

अनेकदा लोक घरात सजावटीसाठी म्हणून फ्रिजवर लहान रोप ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजवर कोणत्याही प्रकारचे रोप ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात अशांतता आणि आर्थिक समस्या वाढू शकतात असे मानले जाते.

एक्वेरियम

फ्रिजच्या वर एक्वेरियम ठेवल्यास तेथे पाणी साठण्याची शक्यता असते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. एक्वेरियम फ्रिजवर ठेवू नये, कारण त्यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. एक्वेरियम ठेवण्यासाठी एक वेगळी जागा निवडणे आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या