या 4 दिवसांत नखे चुकूनही कापू नका; अन्यथा घरात येईल गरिबी

Asavari Khedekar Burumbadkar

ज्योतिषशास्त्राने प्रत्येक कार्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस ठरवलेले आहेत. कोणत्या दिवशी केस कापावे हे तर आपण यापूर्वी जाणून घेतलेच आज आपण कोणत्या दिवशी नखे कापू नये हे जाणून घेऊया. असे मानले जाते की योग्य दिवशी नखे कापल्याने सकारात्मक परिणाम मिळतात, परंतु काही विशिष्ट दिवशी नखे कापल्याने आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य येऊ शकते.

शनिवार

शनिवार हा भगवान शनिदेवाला समर्पित आहे. शकुन शास्त्रानुसार, नखे आणि केस यांसारखा शरीरातील कचरा शनि ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी नखे कापल्याने शनिदेवाला राग येऊ शकतो. शनीच्या रागानंतर आर्थिक नुकसान, दारिद्र्य आणि दुर्दैव देखील वाढते.

मंगळवार

मंगळवार हा भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे. मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक मानला जातो. शकुन शास्त्रानुसार, मंगळवारी नखे कापल्याने व्यक्तीचे धैर्य आणि आत्मविश्वास कमी होतो असे मानले जाते. तसेच तुमच्या डोक्यावरील कर्जही वाढू शकते.

गुरुवार

गुरुवार हा ज्ञान, शिक्षण आणि समृद्धीचा ग्रह असलेल्या गुरू ग्रहाला समर्पित आहे. या दिवशी नखे कापल्याने गुरू ग्रह कमकुवत होतो. यामुळे व्यक्तीच्या ज्ञान, बुद्धिमत्ता आणि संपत्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच वैवाहिक जीवनात अडचणी देखील वाढू शकतात.

रविवार

रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे, जो आत्मा, आरोग्य आणि सन्मानाचा ग्रह मानला जातो. या दिवशी नखे कापणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि आदर तसेच समजातील मान सन्मान कमी होऊ शकतो.

नखे कापण्यासाठी शुभ दिवस:

सोमवार – मनाची शांती येते.
बुधवार – आर्थिक लाभ आणि व्यवसायात वाढ होते.
शुक्रवार – देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते.

सूर्यास्तानंतर नखे कापू नका.

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर किंवा रात्री नखे कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि घरात दारिद्र्य येते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या