२७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. सार्वजनिक स्थळं, मंदिरं, घरांपासून कार्यालयांपर्यंत आणि नाक्यानाक्यांवर सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली जाते. गणपती बाप्पा भक्तांना धन-समृद्धीचं वरदान देतात. मुंबई-पुण्यात अनेक ठिकाणी कार्यालयांमध्ये गणपती स्थापन केला जातो. कामावर, व्यवसायावर बाप्पाची कृपा राहावी यासाठी कार्यालयांमध्येही बाप्पाची स्थापना केली जाते. ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती स्थापन करण्याचे काही नियम आहेत. ज्याचं पालन करणं आवश्यक आहे.
ऑफिसमध्ये गणेशाची मूर्ती स्थापन करण्याचे काही नियम
कोणत्याही मंगल कार्यात आपण सर्वात आधी गणेशाची पूजा करतो. आयुष्यात प्रगती, समृद्धी, यशासाठी बाप्पााच्या आशीर्वादाची आवश्यकता असते.
ऑफिसमध्ये गणेशाची स्थापना करण्याचे काय आहेत नियम
– ऑफिसमध्ये पिवळे, सोनेरी, लाल रंगाची गणेशाची प्रतिमा स्थापन करणं शुभ असतं, काळ्या किंवा निळ्या रंगाची मूर्ती आणू नये. ही चूक मोठी हानिकारक ठरू शकते.
– ऑफिसमध्ये गणेशाची उभी मूर्ती स्थापन करा. कार्यालयाच्या ठिकाणी देवाची उभी मूर्ती स्थापन केल्याने काम जलद गतीने होतो आणि निरंतर यश मिळतं.
– गणेशाची प्रतिमा ईशान्य कोन, उत्तर दिशा आणि पूर्व दिशेला स्थापित करावी. कधीही दक्षिण दिशेला तोंड करून गणेशाची मूर्ती स्थापन करू नये. अन्यथा करिअर-व्यापारात मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
दोन्ही वेळेस नैवेद्य महत्त्वाचा…
– ऑफिसमध्ये गणेशाची मूर्ती स्थापन करायची असेल तर त्याची दोन्ही वेळेस पूजा-आरती व्हायला हवी. बाप्पाला नैवेद्य द्यायला हवा.
– मूर्ती स्थापन करणार ती जागा स्वच्छ असावी. आजूबाजूला चप्पल, झाडू, कचरा पेटीसारख्या गोष्टी ठेऊ नये.
– शौचालयाजवळ मूर्तीची स्थापना करू नये. ज्या ठिकाणी सतत लोक येत-जात असतात अशी जागीची मूर्तीची स्थापना करू नये.
– मूर्तीचा आकार खूप मोठा नसावा. गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी कारण उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा कडक असते. जी ऑफिसमध्ये शक्य होत नाही.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.





