Gauri Avahan Shubhechha in Marathi : ‘आल्या का गौऱ्या, आल्या गं बाई’; गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

gauri avahan pujan 2025 : ३१ ऑगस्ट रोजी घराघरांमध्ये गौराईची स्थापना होणार आहे. ज्याला गौरी आवाहन म्हटलं जातं. यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा.

jyeshtha gauri pujan 2025 : गणरायाच्या आगमनानंतर आता महिलांना देवी गौराईच्या आगमनाचे वेध लागले आहेत. महिलांना गौराई घरी घेऊन येण्याची आतुरता लागून आहे. धार्मिक मान्यतेनुसार, तीन दिवसांसाठी गौराई माहेरी येते अशी परंपरा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या स्वरूपात गौराईची स्थापना केली जाते. कोणाच्या घरी खड्यांच्या गौराई असतात, तर कोणाच्या घरी फुलांच्या गौराई असतात, कोणाकडे ज्येष्ठा-कनिष्ठा अशा दोन गौराई असतात तर कोणाच्या घरी एकच गौराईची स्थापना केली जाते. उद्या (gauri avahan 2025) ३१ ऑगस्ट रोजी घराघरांमध्ये गौराईची स्थापना होणार आहे. ज्याला गौरी आवाहन म्हटलं जातं.

या निमित्ताने आपल्या आप्तजनांना ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या शुभेच्छा द्या. (gauri avahan pujan shubhechha in marathi)

1 आली आली गौराई सोन पावलांच्या रुपाने आली आली गौराई धनधान्यांच्या रूपाने

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

2 सोन्या-मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली गं गौराई, पंचपक्वान्नं, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची करा हो घाई! गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3 गौरी-गणपतीच्या आगमानसाठी सजली संपूर्ण धरणी, सोन्याच्या पावलांनी गौरी येऊ दे आपल्या घरी, लाभो आपणास सुख-समृद्धी होवो आपली प्रगती

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Gauri Avahan Shubhechha in Marathi : 'आल्या का गौऱ्या, आल्या गं बाई'; गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

4 गौरी माते, नमन करते तुला

अखंड सौभाग्य लाभू दे मला

हेच मागणं मागते तुला

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

5 घागर घुमूदे घुमूदे, रामा, पावा वाजू दे

आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे

रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा

आली गौराई अंगणी तिला लिंब-लोण करा

गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

Gauri Avahan Shubhechha in Marathi : 'आल्या का गौऱ्या, आल्या गं बाई'; गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

6 हाती कडे पायी तोडे पैंजणाची,

रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,

झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये

भक्तां घरी चालली,

सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…

आपणा सर्व प्रिय जणांना..

गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

7 सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई

पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा आरतीची घाई,

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया,

घरा दारा लाभो आशीर्वादाची छाया

गौरी पूजनाच्या शुभेच्छा !

Gauri Avahan Shubhechha in Marathi : 'आल्या का गौऱ्या, आल्या गं बाई'; गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

8 लेकी-सुनांची माय माऊली देईल मायेची सावली,

आली गौराई माहेराला, भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला

करा तिची मनोभावे सेवा

ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा

ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9 सोन्याच्या पावलाने येणारी श्री.महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य,धनधान्य,समाधान व उदंड आयुष्य देवो

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

10 गौराई तुमच्या आयुष्यात सुख-समद्धी आणि आनंद घेऊन येवो, हीच प्रार्थना

ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!


About Author

Smita Gangurde

Other Latest News