हिंदू धर्मामध्ये जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्यांचे नाव त्यांच्या जन्मचिन्हानुसार दिले जाते. असे म्हटले जाते की कुंडलीनुसार निवडलेले नाव मुलाचे नशीब चांगलं करते. म्हणूनच, मुलाचे नाव ठेवण्यापूर्वी, एक ज्योतिषी मुलाची कुंडली तपासतो आणि नंतर नाव सुचवतो. आज, आम्ही तुम्हाला काही अक्षरांबद्दल सांगणार आहोत ज्या अक्षरांनी सुरू होणारी नावे असलेल्या मुली त्यांच्या सासरच्यांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. असे म्हटले जाते या मुली लग्न करून ज्या घरात जातात त्यांचं सोनं करतात.
D अक्षराने सुरू होणारे नाव
D अक्षराने नाव असणाऱ्या मुली सासरच्या लोकांची खूप काळजी घेतात. लग्नानंतर अगदी कमी काळातच त्या सासरच्या लोकांची मने जिंकतात. या मुली सासरी जाताच सासरच्यांच नशीब खऱ्या अर्थाने उजाळते. त्या सर्वांना मनोभावे प्रेम करतात, जपतात. एकदा का या मुलीनी एखादं काम करायचं ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय त्या थांबत नाहीत.

K अक्षरापासून असलेले नाव
क अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. सासरच्या कुटुंबासाठी त्या अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. ज्या घरात आत्या लग्न करून जातात ते घर संपत्तीने भरलेले असतं.
L अक्षरापासून सुरू असलेलं नाव
ल अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली त्यांच्या नवऱ्यासाठी खूपच नशीबवान मानल्या जातात. आपला पती आयुष्यात यशस्वी व्हावा यासाठी त्या जीवाचे रान करतात. त्याला भरपूर पाठिंबा देतात. कौटुंबिक वातावरण सकारात्मक कसे राहील, घरात वादविवाद कसे होणार नाहीत, याचीच या मुली काळजी घेत असतात. परिणामी सासरच्या लोकांनाही त्या हव्याहव्याशा वाटतात.
S अक्षरापासून सुरू होणारे नाव
या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलींना संपत्तीची देवी मानले जाते. कारण त्या जिथे राहतात तिथे संपत्तीची कमतरता नसते. सासरच्या कुटुंबात त्यांचे शुभ पाऊल सुख आणि समृद्धी आणते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही
दावा करीत नाही.)