Joined Eyebrows Lucky or Unlucky: समुद्रिका शास्त्रात शरीर आणि चेहऱ्याच्या रचनेबद्दल अनेक संकेत सांगितले आहेत. चेहऱ्यावरील हावभावांपासून ते डोळ्यांच्या रचनेपर्यंत आणि कपाळावरील रेषांपर्यंत अशा अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक संकेत देतात. ज्यांच्या दोन्ही भुवया एकमेकांशी जोडलेल्या असतात ते कोणत्या प्रकारचे लोक असतात. अशा लोकांबद्दल जाणून घेऊया.
असंतुलन आणि अशांती
दोन्ही भवया जोडले म्हणजे संबंधातील कमी संवाद दर्शवते. असे लोक सर्वसाधारणपणे खुलेपणाने बोलण पसंत करत नाहीत. ज्यामुळे गैरसमज पसरतात आणि प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात असंतुलन आणि अशांती निर्माण होते.
कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत
ज्या लोकांच्या दोन्ही भुवया जोडलेल्या असतात असे लोक अपूर्ण योजनेसह आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात करतात. मात्र ही माणसं विचारपूर्वक निर्णय घेतात आणि कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी कोणाच्या दबावाखील येत नाहीत. यांना लवकर राग येतो आणि कोणाच्याही वक्तव्यावर लगेच उलट उत्तर देतात.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेले लोक
भुवया जोडलेल्या लोक कोणत्याही मुद्द्यावर खोलवर विचार करतात. त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असते आणि ते कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यात तज्ज्ञ असतात. हे लोक अजिबात भावनिक नसतात, उलट ते प्रत्येक बाबतीत आपले तर्क मांडतात आणि त्यानुसार कोणताही निर्णय घेतात.
गूढ असतात
असे लोक त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगतात आणि प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे स्वतःचे मत असते. ते त्यांच्या भावना इतर कोणापर्यंत पोहोचू देत नाहीत. ते खूप कमी लोकांना त्यांचे मन कळू देतात आणि हे लोक गूढ असतात.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.





