हिंदू धर्मात, लग्न हे फक्त दोन व्यक्तींचेच नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन मानले जाते. लग्न ठरल्यानंतर आपल्या नातेवाईकांना, पै पाहुण्यांना आणि मित्रांना निमंत्रण देण्यासाठी आपण लग्नाची पत्रिका छापतो. या लग्न पत्रिकेत (Lagn Patrika Tips) सगळी माहिती असते. लग्नाचे ठिकाण, लग्नाची वेळ, नवरा आणि नवरी अशा दोन्ही घरातील सदस्यांची नावे, जवळचे नातलग यांचा उल्लेख या लग्नपत्रिका केला जातो. महत्वाची बाब म्हणजे लोकांची नावे सुद्धा लग्नपत्रिकेत छापली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? लग्नपत्रिका बनवताना काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. या नियमांचे पालन न केल्यास जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही सुद्धा लवकरच लग्न करण्याच्या विचारात असाल तर लग्न सुरळीत पार पडावे यासाठी काही धार्मिक आणि वास्तु नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
वधू वरचे फोटो छापू नका
आजकाल, बरेच लोक वधू-वरांचे फोटो आकर्षक बनवण्यासाठी कार्डवर छापतात. परंतु, वास्तुशास्त्रानुसार, हे शुभ मानले जात नाही. असे केल्याने नवरा नवरीला वाईट नजर लागू शकते आणि अनवधानाने तुमच्या लग्नात तणाव किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात.

भगवान गणेशाचे चित्र (Lagn Patrika Tips)
लोकांना असे वाटते की लग्न पत्रिकेत भगवान गणेशाचा फोटो छापल्याने लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत. परंतु, वास्तुशास्त्रानुसार, हे बरोबर नाही, कारण बहुतेक कार्डे लग्नानंतर कुठेतरी फेकली जातात किंवा सोडली जातात, ज्यामुळे भगवान गणेशाच्या फोटोचा अनादर होतो. म्हणून, कार्डवर चित्राऐवजी, तुम्ही “श्री गणेशाय नम:,” “शुभ विवाह,” किंवा “शुभ मंगलम” असे शुभ शब्द लिहू शकता. (Lagna Patrika Tips)
शुभ कार्डचा रंग आणि मंत्र
वास्तुशास्त्रानुसार, लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा रंग सकारात्मक असावा. उदाहरणार्थ, लाल, पिवळा, केशर किंवा पांढरा कार्ड शुभ मानला जातो, कारण हे रंग प्रेम, सुसंवाद आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत. तसेच लग्नपत्रिकेत गणेश किंवा विष्णू मंत्र लिहावा, जसे की “मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. मंत्र लिहावा
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











