Sunday Lucky Color: रविवारी चुकूनही या रंगाचे कपडे घालून नका, अन्यथा सूर्य देवाचा रोष सहन करावा लागेल

विवारी कपडे घातलाना विशेष रंगांकडे लक्ष द्यायला हवं. हे आपले व्यक्तित्व, ऊर्जा आणि भाग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करू शकतो. रविवारी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये आणि काय आहे कारण?

Sunday Color Remedy : वैदिक ज्योतिष शास्त्रात आठवड्यातील एका दिवसाचा संबंध एक ग्रह आणि विशेष रंगाशी जोडला गेला आहे. ज्या प्रकारे सोमवारी चंद्र आणि सफेद रंगाला महत्त्व देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे रविवारीचा दिवस सूर्य देवाला समर्पित केला जातो. सूर्य देवाचा जगाचा पालनकर्ता आणि ऊर्जेचा स्त्रोत म्हटलं आहे. मान्यतेनुसार, रविवारी कपडे घातलाना विशेष रंगांकडे लक्ष द्यायला हवं. हे आपले व्यक्तित्व, ऊर्जा आणि भाग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करू शकतो. रविवारी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये आणि काय आहे कारण?

रविवारी स्वामी ग्रह आणि रंग

रविवारचा स्वामी ग्रह सूर्य देव आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचा प्रिय रंग लाल आणि नारंगी मानला जातो. या कारणास्तव रविवारी या रंगाचे कपडे घालणे शुभ आणि ऊर्जावान मानलं जातं. सूर्य आत्मविश्वास, शक्ति, यश आणि नेतृत्व क्षमतेचा कारक आहे. मात्र या दिवशी काही ठराविक रंगाचे कपडे घालणं टाळायला हवं. याचा सूर्याच्या ऊर्जेपेक्षा वेगळा परिणाम होतो.

रविवारी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये?

काळ्या रंगाचे कपडे – काळा रंग शनिग्रहाचा प्रतिनिधी मानला जातो. रविवारी सूर्याचा दिवस आहे आणि शनि आणि सूर्याचा एकमेकांसोबत सहावा आणि आठवा संबंध मानला गेला आहे. त्यामुळे या दिवशी काळे रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते. यामुळे आळस, थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो. सोबतच कामात अडथळा येऊ शकतो.

निळ्या रंगाचे कपडे

निळा रंगाही शनि आणि राहूशी संबंधित मानला गेला आहे. रविवारी या रंगाचे कपडे घातल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

राखाडी किंवा गडद तपकिरी रंगाचे कपडे

ज्योतिषशास्त्रानुसार, हे रंग दुःख आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. रविवारी असे कपडे परिधान केल्याने निराशा, आळस आणि उर्जेचा अभाव होऊ शकतो. कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांमध्येही थंडपणा येऊ शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Smita Gangurde

Other Latest News