नजर लागणे हा शब्द तुम्ही ऐकला असेलच…. मला याची नजर लागलीय, त्याला कोणाची तरी नजर लागलीय हे तुम्ही ऐकलं असेलच… वास्तुशास्त्रानुसार, असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला किंवा घराला कोणाची नजर लागली तर त्यावेळी संबंधित व्यक्तीमध्ये काही बदल दिसू लागतात जसं की, शारीरिक आणि मानसिक समस्या, अचानक डोके दुखी, चक्कर येणं, स्वभाव चिडचिडा होणं, झोप न येणं, थकवा जाणवणं, असे अनेक लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतात.
घरालाही लागू शकते नजर
नजर फक्त व्यक्तीलाच लागते असं नाही तर घराला देखील लागू शकते, जर घराला नजर लागली तर अचानक व्यापारामध्ये मोठं नुकसान होणं, आर्थिक समस्या निर्माण होणं, घरात कायम वादविवाद भांडणं होणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात, नजर लागली तर त्यावर काय उपाय करावेत? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे, ती आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहेत उपाय? Vastu Tips
जर तुम्हाला किंवा घराला कोणाची नजर लागली असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय करू शकता. संध्याकाळच्या वेळी लवंग, कापूर आणि एक शेणाची गवरी घ्या, तसेच मोहरीचं तेल देखील सोबत घ्या, या गवरीवर मोहरीचं तेल टाकून ती गवरी पेटवा, त्यामध्ये कापूर आणि लवंगा टाका आणि त्याचा जो धूर होईल, तो संपूर्ण घरात फिरवा.
वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होतं. जर तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल तर त्याचं मुख्य लक्षण असतं, की घरामध्ये सतत भांडणं होतात, कारण नसताना वादविवाद होतात, मात्र तुम्ही जर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
अशी दूर करा घरातील नकारात्मक ऊर्जा
जर तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, घरामध्ये सतत भांडणं होत राहतात, कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नाही? आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत? तर त्यामागे वास्तुदोष असू शकतो, असा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरातील देवघरासमोर एक कापूर लावा, दररोज कापूर लावल्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुम्हाला त्याचा अपेक्षित प्रभाव देखील पहायला मिळतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











