दारावर लिंबू-मिरची का लटकवतो ? जाणून घ्या यामागच वैज्ञानिक कारण..

Asavari Khedekar Burumbadkar

घराच्या किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि मिरच्या लटकवण्याची प्रथा अनेक संस्कृतींमध्ये पाळली जाते. भारतात लोक वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या अवलंबतात. यामध्ये, कधीकधी ते तांत्रिकाची मदत घेतात, तर कधीकधी ते स्वतःच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी घरी विविध उपाय करून पाहतात. अनेकदा तुम्ही प्रत्येक घरात लिंबू आणि मिरचीची युक्ती पाहिली असेल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिंबू आणि मिरची ठेवल्याने कोणाचीही वाईट नजर पडू शकत नाही.  घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करू शकते आणि नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते, असे वडीलधाऱ्यांचे म्हणणे आहे. घर नवीन असो वा जुने, दुकान असो, गाडी असो किंवा कधीकधी सायकल असो, लोक लिंबू आणि मिरचीचा हा उपाय अवलंबतात. लिंबू आणि मिरची घराच्या दरवाज्यावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लटकवल्यास घर आणि व्यवसायाला वाईट नजर लागत नाही असा अनेकांचा समज आहे. दुसरीकडे अनेक लोक याला अंधश्रद्धा मानतात. दरम्यान घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर लटकवले जाणाऱ्या लिंबू आणि मिरचीला वास्तूशास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे.

वाईट नजरेपासून संरक्षण मिळते

वास्तूशास्त्रानुसार घर आणि दुकानांच्या बाहेर लिंबू – मिरची लटकवल्याने वाईट नजर पडत नाही. त्यापासून संरक्षण मिळते. लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. लिंबू-मिरची टांगल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपत्तीपासून दूर राहते. जर तुम्ही ते दुकानात टांगले तर तुमचा व्यवसाय वाढेल.

यामागे काय आहे शास्त्र

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते. आपण ते कोणत्याही दारावर टांगले तर त्याच्या उग्र वासामुळे माश्या आणि किटक घरात प्रवेश करत नाहीत. त्यामुळे सभोवतालचे वातावरणही शुद्ध होते. घराबाहेर टांगल्याने आपले आरोग्यही चांगले राहते.

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, लिंबू आणि मिरची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात, ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि शांती टिकून राहते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या