शिर्डी साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा अतूट आणि निस्सीम आहे. साईबाबांनी “सबका मालिक एक” हा संदेश देत सर्व धर्मांना एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यांच्या शिकवणींमध्ये प्रेम, दया, संयम आणि श्रद्धेचे महत्व अधोरेखित केले आहे. आजही लाखो भक्त शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेची अनुभूती घेतात. ‘ सबका मलिक एक ‘ या नावाने भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईबाबा आपल्या सर्व भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करतात. गुरूवारी साईबाबांची पूजा आणि उपवास केल्याचे अनेक फायदे असतात.
गुरूवारी साईबाबांची पूजा आणि उपवास
‘ सबका मलिक एक ‘ या नावाने भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईबाबा आपल्या सर्व भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करतात. असं म्हणतात की जर आपण 9 गुरुवार साईबाबांचे उपवास करतात तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या सर्व दुखी भक्तांचे सर्व दुःख दूर करणारे साई बाबा त्यांची प्रत्येक इच्छा मग ती नोकरी मिळण्यासाठी ची असो, लग्नासाठी,व्यवसाय चांगला चालण्यासाठी ची असो ,प्रगतीची ,चांगला,पगार होण्याची असो, सर्व इच्छा पूर्ण करतात.

मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग आणि उपाय
दर गुरुवारी साईबाबाचे उपवास करून पूजा केली पाहिजे. कोणत्याही शुक्ल किंवा कृष्ण पक्षात कोणत्याही तिथीच्या गुरुवार पासून हे उपास आपण सुरु करू शकता. सतत 9 गुरुवार उपास केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात . या शिवाय साईच्या मंत्रांचे जाप केल्याने आपल्या जीवनातील सर्व त्रास,दुःख देखील दूर होऊन प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात. या विशेष मंत्रांनी साईबाबांचे नाम स्मरण दररोज किंवा दर गुरुवारी सकाळ ,संध्याकाळ करावे , साई बाबा आपले सर्व दुःख आणि त्रास नाहीसे करतील.
जप करण्यासाठी साईंचे मंत्र











