ऑनलाईन गेममध्ये पैसे हरला; नाशिकमध्ये 16 वर्षीय तरूणाने संपवले जीवन!

ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मोबाइलवरील ऑनलाईम गेममध्ये पैसे हरल्यामुळे नाशकातील सोळा वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोड येथे बुधवारी घडली. उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सम्राट संदीप भालेराव असे या मुलाचे नाव आहे. एकुलत्या मुलाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शिवाय या प्रकरणी सायबर विभाग तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

पैसे हरल्याने मुलाने जीवन संपवले!

नाशिकमधील आर्टीलरी सेंटर रोड येथील आर्टिलरी गेटजवळील डायमंड रो-हाउस क्रमांक सहामध्ये सम्राट आई व दोन बहि‍णींसह राहतो. तो मंगळवारी रात्री घरात होता. त्याचे मामा ज्ञानेश्वर भालेराव बुधवारी सकाळी त्याला उठवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. त्यांना सम्राट छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सम्राट वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत होता. गेल्या वर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली होती.

ऑनलाईन गेमिंगपासून रहा सावध!

ऑनलाइन गेमिंग करताना फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अज्ञात व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. खाजगी माहिती जसे की OTP, पासवर्ड, बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नका. अधिकृत अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स वापरा. अनोळखी ऑफर्स आणि बक्षिसांची भूल पडू नका. थेट पैसे ट्रान्सफर करताना काळजी घ्या. गेमिंग प्लॅटफॉर्मवर सिक्युरिटी सेटिंग्ज अपडेट ठेवा. बालकांना देखरेखीखाली गेम खेळू द्या. कोणतीही संशयास्पद कृती दिसल्यास त्वरित रिपोर्ट करा. सायबर सुरक्षेचे नियम पाळा आणि सजग राहा. सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News