महाराष्ट्र – गुजरात सीमावादाचा प्रश्न तापला; गुजरातची थेट महाराष्ट्रात घुसखोरी, नेमका काय विषय?

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात महाराष्ट्र–गुजरात सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा आणि अच्छाड या ग्रामपंचायतींशी निगडीत सीमारेषांबाबत दोन्ही राज्यांमध्ये अलीकडेच तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांकडून गुजरातच्या घुसखोरीचे आरोप केला आहे.

सीमावाद हा विषय महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. त्यातच आता महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सीमावाद आता पुन्हा उफाळून आला आहे. पालघरमधील तलासरी तालुक्यातील वेवजी गावात गुजरात(Gujrat) घुसखोरी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या वेवजी गावात गुजरातकडून हळूहळू महाराष्ट्राच्या सीमाभागात घुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गावात सीमा वाढवून गाव गिळंकृत करण्याचा गुजरातचा डाव असल्याचा ग्रामस्थ्यांनी केला आहे. मागच्या 25-30 वर्षांपासून या भागात सीमावाद सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात सीमावादाचा प्रश्न चिघळला !

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात महाराष्ट्र–गुजरात सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा आणि अच्छाड या ग्रामपंचायतींशी निगडीत सीमारेषांबाबत दोन्ही राज्यांमध्ये अलीकडेच तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांकडून गुजरातच्या घुसखोरीचे आरोप केला आहे. तलासरीतील वेवजी गावाच्या हद्दीत गुजरात राज्याकडून हळूहळू अतिक्रमण होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या भागात दोन्ही राज्यांच्या हद्दी एकमेकांना भिडतात आणि अनेक वर्षांपासून ही सीमारेषा स्पष्टपणे निश्चित न झाल्याने सातत्याने वाद उद्भवत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अतिक्रमणामुळे सुमारे काहीशे मीटरपर्यंतचा भाग विवादित बनला असून दोन्ही राज्यांच्या प्रशासनात चिंता वाढली आहे.ग्रामस्थांनी या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवल्यानंतर, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त मोजणीचे काम सुरू केले आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील सीमारेषांचे पुनर्मापन करताना अधिकृत नकाशे, दस्तऐवज आणि जुन्या नोंदींचा आधार घेतला जात आहे.

भविष्यातील वाद टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

जवळपास 25–30 वर्षांपासून सुरू असलेला हा सीमावाद अलीकडे पुन्हा तीव्र होत असल्याचे दिसत आहे. स्थानिकांमध्येही याबाबत नाराजी असून, प्रशासनाने जलद आणि स्पष्ट निर्णय द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संयुक्त मोजणीचा अहवाल येईपर्यंत कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहिले जात असून, सीमा स्पष्ट करून भविष्यातील वाद टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी माहिती मिळत आहे.दरम्यान स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी महाराष्ट्रात कुठलीही घुसखोरी करू देणार नाही अशी कठोर भूमिका घेतली आहे.स्थानिक नागरिकच्या जागेत कुठलीही घुसखोरी सहन करणार असा इशारा गावित यांनी दिला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News