मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश; 390 कोटींचे ड्रग्ज जप्त, 8 जणांना अटक

मुंबई पोलिसांनी साकीनाका ते म्हैसूर, कर्नाटक अशी लिंक असणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट मोठे असण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांनी साकीनाका ते म्हैसूर, कर्नाटक अशी लिंक असणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जवळपास सात दिवस पोलिसांची ही मोहीम सुरू होती अशी माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल 192 किलोग्राम मेफेड्रोन ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणात 8 जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

कर्नाटकमधील म्हैसूर येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल 192 किलोग्राम मेफेड्रोन  ड्रग्ज जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 390 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून अंमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. ही कारवाई 25 जुलै रोजी सुरू झाली. झोन 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या पथकाने बांद्रा रिक्लेमेशन येथून सलीम इम्तियाज शेख उर्फ सलीम लांडगा (45) याला 25 जुलै रोजी ताब्यात घेतले. सलीमच्या चौकशीतूनच या मोठ्या अंमली पदार्थ निर्मिती आणि तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला.

रॅकेटचे धागेदोर कर्नाटकात

चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हैसूरच्या रिंग रोडवरील एका इमारतीवर छापा टाकला. बाहेरून ही इमारत हॉटेल किंवा गॅरेजसारखी दिसत असली तरी आतमध्ये मेफेड्रोन बनवण्याचा एक मोठा कारखाना चालवला जात असल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणाहून मुंबई आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता.

संपूर्ण प्रकरणाचा तपास या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाला होता. पोलिसांनी साकीनाका येथून 52 ग्रॅम मेफेड्रोनसह एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून 4.53 किलो मेफेड्रोन सुमारे 8 कोटी रुपये किमतीचे जप्त केले. यानंतर या तपासाला वेग आला.

26 जुलै रोजी म्हैसूरमध्ये मोठी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत सलीम व्यतिरिक्त आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. यामुळे या रॅकेटची व्याप्ती समोर आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे एक मोठे अंमली पदार्थांचे रॅकेट आहे आणि या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.  आता आगामी काळात याबाबत आणखी काही मोठा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News