Pooja Bhatt : पुजा भट्टच्या नवऱ्याचे 7 फोटो, पाचवा पाहून म्हणाल भट्ट कुटुंबातील सर्वात हँडसम जावई

Smita Gangurde

पूजा भट्ट हिचा जन्म २४ फेब्रुवारी १९७२ साली मुंबईत झाला. तिच्या वडिलांचं नाव महेश भट्ट आणि आई किरण भट्ट. आलिया भट्ट तिची सावत्र बहीण. पूजा भट्टने १९८९ पासून डॅडी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर दिल है के मानता नही आणि सडक सारख्या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. १९९० च्या दशकात बोल्ड आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून तिची ओळख झाली. यानंतर तिने तमन्ना, जख्म सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आणि पाप सारख्या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.

बॉम्ब बेगमच्या माध्यनातून पूजाने ओटीटीमध्ये घेतली एन्ट्री

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर पूजाने २००३ मध्ये मनिष मखीजासोबत लग्न केलं. आणि २०१४ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर काही काळ पूजा चित्रपटापासून लांबच होती. यानंतर ती २०२१ मध्ये बॉम्ब बेगमच्या निमित्ताने तिने ओटीटीमध्ये एन्ट्री घेतली.

पूजाचा जन्म २४ फेब्रुवारी १९७२ रोजी महेश भट्ट आणि किरण भट्ट यांच्या पोटी झाला. तिला आलिया आणि शाहीन भट्ट या बहिणी आणि भाऊ राहुल भट्ट आहेत.


पूजाने २००३ मध्ये व्हीजे-बिझनेसमन मनीष मखीजाशी लग्न केलं. परंतु २०१४ मध्ये ते वेगळे झाले. त्या लग्नानंतर तिने पुन्हा लग्न केलं नाही.


पूजा आधी रणवीर शौरीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती आणि नंतर तिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.


पूजाने मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर वडिलांचा चित्रपट डॅडीमधून डेब्यू केलं आणि यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डने गौरविण्यात आलं.


दिल है के मानता नही हा तिची पहिला ठळक आठवणीत राहणारा चित्रपट. हा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता.


पूजाने १९९६ मध्ये स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. २००३ मध्ये पाप चित्रपटातून तिनं दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं.

पूजाने २०२१ मध्ये बॉम्ब बेगमच्या निमित्ताने तिने ओटीटीमध्ये एन्ट्री घेतली.

 

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्या