प्रसिद्ध गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) याने नुकतीच आपल्या आयुष्यातील काही खास आणि धक्कादायक गोष्टी शेअर केल्या आहेत. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, आदित्यने केवळ ७ व्या वर्षीच पहिला कर भरला होता! होय, ऐकायला हे खरं वाटतं नसलं तरी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये आदित्यने सांगितले की, तो बालकलाकार म्हणून एका ग्लोबल टूरवर गेला होता आणि तिथे त्याला सुमारे ३.५ लाखांची कमाई झाली होती. या कमाईवर त्याने पहिल्यांदाच सरकारला टॅक्स भरला.
‘सा रे गा मा पा’ मुळे प्रसिद्धी आणि मोठी कमाई – Aditya Narayan
बालवयातच शोबिझच्या जगाचा अनुभव घेतलेल्या आदित्यने मोठेपणी ‘सा रे गा मा पा’ या प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शोचं होस्टिंग केलं. या एका सिझनसाठी त्याला एकूण ७८ लाख रुपये मानधन मिळाले! आदित्यने सांगितले की, यासाठी त्याने तीनदा ऑडिशन दिले होते. त्याला एका एपिसोडसाठी ७,५०० रुपये मानधन मिळत होतं, आणि दररोज दोन एपिसोड्स शूट होत. त्यामुळे दररोजची कमाई १५,००० रुपये इतकी होती. एकूण ५२ एपिसोड्स होस्ट केल्यानंतर त्याची कमाई ७८ लाखांवर पोहोचली. पण आदित्य सांगतो की, त्या काळात तो दरमहा ७५,००० रुपये खर्च करायचा, त्यामुळे फारशी बचत होत नव्हती. मात्र नंतर त्याला समजलं की पैसा आणि प्रसिद्धीबरोबर जबाबदारीही वाढते. Aditya Narayan

सध्या कोणत्या शोमध्ये आहे आदित्य?
सध्या आदित्य नारायण अशनीर ग्रोव्हर यांच्या रिअॅलिटी शो ‘राइज अॅण्ड फॉल’ मध्ये झळकत आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.