सध्या सर्वत्र मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सर्वसामान्य माणसाप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बड्या लोकांच्या घरातही गणराया विराजमान झाले आहेत. नुकतंच टीव्ही अभिनेता अली कोणी आणि जास्मिन बसिन यांनी अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले . यावेळी सर्वजण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत होते, परंतु अली गोनी (Aly Goni) मात्र गणपती बाप्पा मोरया असं म्हणताना दिसला नाही. परिणामी त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रॉलींगचा सामना करावा लागत आहे. नेटकरांनी तर सोशल मीडियावर अली गोणीच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. एक युजर्स म्हणाला की जर अली गणपती बाप्पा मोरया म्हणू शकत नसेल तर त्याने अशा उत्सवांना उपस्थित राहू नये.
नेटकऱ्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले- Aly Goni
काही वापरकर्त्यांनी जास्मिन मशिदीत जातानाचे व्हिडिओ शेअर केले आणि म्हटले की जास्मिन मशिदीत जाऊ शकते. पण अली गणपती बाप्पा मोरया म्हणू शकत नाही. तर तिसऱ्या एका युजर्सने म्हटले- जास्मिनने अलीला गणपती बाप्पा म्हणायला सांगितले पण अलीने ते म्हटले नाही. मी नेहमीच म्हणत आलो आहे की धर्मनिरपेक्षता फक्त एका बाजूने असते.

आणखी एका युजरने अली गोणीच्या या कृतीवर टीका करत म्हटलं, “त्याचे नाव अली (Aly Goni) आहे, तो सनातनी नाही. एकाने म्हटले “तो अल्लाह अकबर म्हणेल. एकूणच काय तर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ नये दुसरीकडे गणपती बाप्पा मोरया असा जयघोष न केल्याने अली गोणीला नेटकऱ्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत
निया शर्माने मात्र अली गोणीचे समर्थन केले-
एकीकडे अली गोनी (Aly Goni) याला प्रचंड ट्रॉलिंगचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे अभिनेत्री निया शर्माने मात्र अली गोणीचे समर्थन केलेले आहे .निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अली आणि जास्मिनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं की, “एखाद्याच्या उत्सवाचा भाग असणे हा स्वतःमध्ये सर्वात मोठा सन्मान आहे. आणि आपण भारतात गणपती, ईद आणि प्रत्येक सण त्याच भक्ती आणि उत्साहाने साजरा करतो.











