Anurag Kashyap On Aaishvary Thackeray : ‘ठाकरे’ मला माहितीच नव्हतं! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाला चित्रपटात घेतल्यानंतर अनुराग कश्यप यांचे वक्तव्य चर्चेत

मला खरंच माहीत नव्हतं की तो ठाकरे घराण्यातला आहे. इतकंच काय, तो महाराष्ट्रीयन आहे हेही मला नंतर समजलं.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा आगामी क्राइम ड्रामा चित्रपट ‘निशांची’ १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून एक नवा चेहरा पदार्पण करत आहे. ऐश्वर्य ठाकरे….. ऐश्वर्य ठाकरे हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनुराग कश्यप यांना सुरुवातीला हे माहितच नव्हतं की ऐश्वर्य हे ‘ठाकरे’ घराण्यातील आहे.

मला त्याचे आडनाव माहीतच नव्हतं – अनुराग कश्यप (Anurag Kashyap On Aaishvary Thackeray)

एका मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाले, “मी नेहमी असे कलाकार शोधतो जे पात्रात फिट बसतील आणि जे तयारीसाठी वेळ देतील. ऐश्वर्यने मनोज वाजपेयांचा ‘शूल’ मधील एक मोनोलॉग सादर केला होता आणि तिथेच मला त्याच्यातील क्षमतेची झलक दिसली. मला खरंच माहीत नव्हतं की तो ठाकरे घराण्यातला आहे. इतकंच काय, तो महाराष्ट्रीयन आहे हेही मला नंतर समजलं. Anurag Kashyap On Aaishvary Thackeray

४ वर्ष फक्त एकाच चित्रपटासाठी समर्पित

अनुराग कश्यप यांच्यानुसार, ऐश्वर्यने या चित्रपटासाठी संपूर्ण समर्पण दिलं. “मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की तुला ‘कनपुरिया’ म्हणजेच कानपूरच्या बोली-भाषेत रुळायचं आहे. त्यानं ते मनापासून स्वीकारलं. त्याने आपल्या आयुष्यातील ४ वर्षे फक्त ‘निशांची’ साठी दिली. आणि त्याने या काळात दुसरी कोणतीही फिल्म साइन केली नाही,” असंही त्यांनी सांगितलं.“जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्याने स्वत:हून सांगितलं की तो कोण आहे. त्याला संगीताची आवड आहे आणि तो काही अॅक्टिंग वर्कशॉप्स करत होता. मी त्याला स्क्रिप्ट दिली आणि तो खूप उत्साही झाला,” अशी आठवण अनुराग कश्यप यांनी शेअर केली. Anurag Kashyap On Aaishvary Thackeray

निशांची’ – गुन्हेगारी आणि त्याचे परिणाम

अनुराग कश्यप यांनी त्यांच्या चित्रपटाविषयी एक महत्त्वाचं विधान केलं  “मी कधीच गुन्ह्याचं महिमामंडन केलं नाही. माझ्या दृष्टीने, प्रत्येक गुन्ह्याचा परिणाम असतो. प्रत्येक चित्रपटात माझं दृष्टिकोन वेगळं असलं, तरी शेवटी गुन्ह्याची किंमत भरावीच लागते. ३ सप्टेंबर रोजी ‘निशांची’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक व समीक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News