Anurag Kashyap On Virat Kohli : कोहलीवर बायोपिक बनवणार नाही, मी त्याला जवळून ओळखतो; अनुराग कश्यप असं का म्हणाला??

मला बायोपिक करायची असेल, तर मी एखादा कठीण विषय निवडेल. आणि एखाद्या अशा व्यक्तीवर बायोपिक करेल ज्याची लोकांना माहीत होणं गरजेचं आहे

भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ विराट कोहलीची बायोपिक बनवायचा विषय जरी निघाला तरी बॉलीवूड मधील मोठमोठ्या दिग्दर्शकांमध्ये चढाओढ पाहायला मिळेल… विराट कोहलीचे फॅन्स…. त्याचा फिटनेस आणि त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा या सर्वाचा संपूर्ण देश दिवाना आहे…. त्यामुळे विराट कोहलीची बायोपीक म्हणजे दिग्दर्शकासाठी जणू लॉटरी ठरणार आहे… मात्र बॉलीवूड मधील एका बड्या दिग्दर्शकाने थेट विराट कोहलीची बायोपीक (Anurag Kashyap On Virat Kohli) मी कधी बनवणार नाही असं म्हणून खळबळ उडवून दिली आहे..  आणि हा दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून त्याचं नाव आहे अनुराग कश्यप….

काय म्हणाला अनुराग कश्यप? Anurag Kashyap On Virat Kohli

फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीवर बायोपिक बनवायला तुला आवडेल का? असा प्रश्न दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचारण्यात आला होता. त्यावेळी अनुराग कश्यपनं म्हटलं की…..मी विराट कोहलीवर बायोपिक बनवणार नाही. याचे कारण म्हणजे विराट कोहली हा आधीच खूप लोकांचा, विशेषतः मुलांचा, आदर्श आहे. मला बायोपिक करायची असेल, तर मी एखादा कठीण विषय निवडेल. आणि एखाद्या अशा व्यक्तीवर बायोपिक करेल ज्याची लोकांना माहीत होणं गरजेचं आहे.. Anurag Kashyap On Virat Kohli

कोहलीचे तोंडभरून कौतुक –

यावेळी विराट कोहलीचे कौतुक करायलाही अनुराग कश्यप विसरला नाही. विराट कोहली खूप सुंदर माणूस आहे. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. विराट एक खरा माणूस आहे. तो खूप भावनिक आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व अद्भुत आहे. पण मी त्याच्या बायोपिकबद्दल असे म्हणेन की विराटची बायोपिक हा त्याच्यासाठी कठीण विषय नाही. अशाप्रकारे अनुरागनं विराट कोहलीवर बायोपिक का बनवणार नाही हे स्पष्ट केले.

अनुरागच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा ‘निशांची’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो यात मुख्य भूमिकेत आहेत. हा ऐश्वर्यचा पहिला चित्रपट आहे. अनुराग देखील अभिनेता म्हणून दिसणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News