अशनीर ग्रोवर यांच्या यजमानत्वाखाली पार पडलेल्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘राइज अँड फॉल’ चा विजेता अखेर जाहीर झाला आहे. अभिनेता अर्जुन बिजलानी यांनी पाच स्पर्धकांना तगडी टक्कर देत अंतिम विजेता म्हणून ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. त्यांच्या विजयानंतरची ट्रॉफीसह त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अर्जुनच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद त्यांच्या चाहत्यांच्या मनाला भावत आहे.
किती बक्षिस मिळाले
या शोमध्ये केवळ ट्रॉफीच नव्हे तर अर्जुनला विजेता म्हणून २८ लाख १० हजार रुपयांची मोठी बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. आरुष भोला हा शोचा फर्स्ट रनर-अप ठरला असून अरबाज पटेल सेकंड रनर-अप ठरला आहे. अर्जुनने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पत्नी नेहा स्वामी आणि आपल्या मुलाला दिले आहे. त्याने सांगितले की, “माझ्या या यशाचे खरे श्रेय माझ्या बायकोला जाते. तुम्हाला माहिती आहे का, मी आता काय करू इच्छितो? मी फक्त घरी जाऊन माझ्या बिछान्यावर झोपायचं आहे. मला वाटतं की हेच मी खरोखर करू इच्छितो.” त्यानंतर अर्जुनने सांगितले की, “मी माझ्या मुलाला मिठी मारू इच्छितो.”

सोशल मीडियावर अर्जुन बिजलानीच्या विजयाचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चाहते त्याला ‘राइज अँड फॉल’ जिंकल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देत आहेत.
कोण आहे अर्जुन?
अर्जुन बिजलानी हा एक लोकप्रिय भारतीय अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००४ मध्ये केली आणि त्यानंतर तो अनेक यशस्वी मालिकांमध्ये झळकला आहे. ‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’, ‘मेरी आशिकी तुमसे ही’, ‘इश्क में मरजावां’ अशा मालिकांमधील त्याच्या भूमिकांनी त्याला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयासोबतच अर्जुनने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला असून, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘स्मार्ट जोडी’ यांसारख्या कार्यक्रमांतून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची व्यक्तिमत्त्व, अभिनयातील सहजता आणि मेहनतीची तयारी यामुळे तो तरुण वर्गात विशेष लोकप्रिय आहे. अर्जुनचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं असून, तो नेहा स्वामीसोबत विवाहबद्ध झाला असून त्यांना एक मुलगा आहे. टीव्ही क्षेत्रातील एक मेहनती आणि गुणी अभिनेता म्हणून अर्जुन बिजलानी आज आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.











