मुंबईकरांच्या आणि गणेशभक्तांच्या काळजाचा ठाव घेणारा लालबागचा राजा यंदा काहीसा वेगळ्या कारणाने चर्चेत राहिला. दरवर्षीप्रमाणे शाही मिरवणूक, लाखो भक्तांची गर्दी, आणि भावनिक निरोपाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे विसर्जन मात्र तब्बल 33 तासांनी पार पडले. मात्र या वर्षीचा विलंब केवळ वेळेचं नियोजन चुकल्यामुळे नव्हे, तर गुजरातहून आणलेल्या ‘हायटेक तराफ्या’ मुळेही ठरल्याची चर्चा शहरभर रंगली. Arti Solanki On Lalbaugcha Raja
गुजरातचा तराफा स्थिर राहतच नव्हता
गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी पोहोचलेला ‘लालबागचा राजा’ यंदा आधुनिक तंत्रज्ञानाने सजवलेल्या एका विशेष तराफ्यावर चढवण्यात येणार होता. मात्र, समुद्रातील ओहोटीची वेळ योग्य साधता न आल्यामुळे, तराफा पाण्यात स्थिर होऊ शकला नाही. परिणामी, राजाची मूर्ती समुद्राच्या लाटांवर हेलकावत राहिली आणि अखेर कोळी बांधवांनीच पाण्यात उतरून मूर्तीला सांभाळलं

सोशल मीडियावर ट्रेंड: “राजा केवळ कोळ्यांचाच
हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी हे दृश्य शेअर करत, “राजा नेहमी कोळी बांधवांचाच राहिला आहे” अशा भावना व्यक्त केल्या. ‘महागड्या तराफ्यापेक्षा समुद्राशी जुळलेली माणसंच महत्त्वाची’ असा सूर अनेक पोस्टमध्ये दिसून आला.
आरती सोळंकीची पोस्ट चर्चेत – Arti Solanki On Lalbaugcha Raja
या सर्व गदारोळात अभिनेत्री आरती सोळंकी हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक रोचक आणि मार्मिक प्रतिक्रिया दिली. तीने सोशल मीडियावरच्या आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे की, “बहुतेक गुजरातवरुन विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा, राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना… काय करणार…” आरतीची ही पोस्ट अनेकांनी शेअर केली, काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी ‘सांस्कृतिक भावना दुखावल्याचा’ आरोपही केला.
दरम्यान, 33 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘लालबागचा राजा’चा विसर्जन सोहळा पूर्ण झाला. परंतु, यंदाचा विसर्जन अनुभव मुंबईकरांसाठी एक शंका घेऊन गेला आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरांची सांगड कशी घालायची? या वर्षीच्या विसर्जनातील गोंधळ लक्षात घेता, पुढील वर्षी नियोजन अधिक काटेकोर होणार अशी अपेक्षा आहे. कोळी समाजाची भूमिका आणि स्थान पुन्हा अधोरेखित झाले असून, ‘परंपरा आणि माणुसकी’ यांचीच खरी पूजा ठरते, हे पुन्हा सिद्ध झालं.











