शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने आपल्या पहिल्याच वेब सिरीजद्वारे बॉलीवूडमध्ये अशी गोष्ट घडवून आणली आहे, जी गेल्या साडेतीन दशकांपासून कोणीही करू शकला नाही. ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या बहुप्रतिक्षित वेब सिरीजमधून आर्यनने दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे आणि सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे या सिरीजमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान तिघेही झळकणार आहेत!
पहिल्यांदाच एकत्र येणार 3 खान! Aryan Khan
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली तिघे अभिनेत्यांना, शाहरुख, सलमान आणि आमिरला – एकाच प्रोजेक्टमध्ये आणणं हे अनेक निर्मात्यांचं स्वप्न राहिलं आहे. मात्र ते प्रत्यक्षात उतरवलं आहे २७ वर्षीय आर्यन खानने. (Aryan Khan) ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’चा टीझर आणि ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यामध्ये सलमानचा दमदार अंदाज, शाहरुखचा स्वॅग आणि आमिरची झलक एकत्र पाहायला मिळते.

मालिकेची कथा आणि तगडी स्टारकास्ट
या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका लक्ष्य लालवाणी आणि सहर बंबा साकारणार आहेत. त्यांच्यासोबत बॉबी देओल, मोना सिंग, मनोज पाहवा आणि आन्या सिंग यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय करण जोहर, रणवीर सिंग, दिशा पाटणी, बादशाह आणि अर्जुन कपूर यांचेही विशेष कैमिओ आहेत.
‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ केव्हा आणि कुठे पाहता येईल?
ही सिरीज येत्या १८ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. सध्या टीझर आणि ट्रेलरवर प्रेक्षकांची जोरदार प्रतिक्रिया येत असून, सोशल मीडियावर ‘खानत्रयी एकत्र!’ ही चर्चा चांगलीच रंगली आहे. शाहरुख, सलमान आणि आमिर एकत्र खरोखर स्क्रीन शेअर करणार का? की त्यांची झलक वेगवेगळ्या सीन्समध्ये असेल? यावर सध्या पडदा आहे. प्रेक्षकांना याचं उत्तर मिळेल ते थेट सिरीज प्रदर्शित झाल्यावरच











