Baaghi 4 Box Office Collection : Baaghi 4ने रचला इतिहास; या 3 चित्रपटांना टाकलं मागे

बागी 4 ने आतापर्यंत भारतात एकूण 53.37 कोटी कमावले असून, जगभरातील एकूण कमाई आता 69.68 कोटींवर पोहोचली आहे.

टायगर श्रॉफ, संजय दत्त, मिस वर्ल्ड हरनाज संधू आणि पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘बागी 4’ ने बॉक्स ऑफिसवर (Baaghi 4 Box Office Collection) दमदार पदार्पण केलं आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुरुवातीच्या काही दिवसांतच तुफान कमाई करत जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची गती आता थोडी मंदावली असली, तरी वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत बागी 4 ने मोठा रेकॉर्ड ब्रेक करत अनेक जुन्या हिट चित्रपटांना मागे टाकलं आहे.

बागी 4 ची जगभरात धूम – Baaghi 4 Box Office Collection

Sacnilk.com च्या अहवालानुसार, बागी 4 ने आतापर्यंत भारतात एकूण 53.37 कोटी कमावले असून, जगभरातील एकूण कमाई आता 69.68 कोटींवर पोहोचली आहे. हे आकडे लक्षात घेतले तर बागी 4 ने तीन मोठ्या चित्रपटांचे लाइफटाईम वर्ल्डवाइड कलेक्शन पार केलं आहे:

1. सन ऑफ सरदार 2 – 66.01 कोटी
2. मेट्रो इन दिनों – 69.68 कोटी
3. विक्की विद्या का वो वाला वीडियो – 58.21 कोटी

या सर्व चित्रपटांना मागे टाकत बागी 4 आता अ‍ॅक्शन जनराच्या यशस्वी फ्रँचायझी म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

*भारतातील दिवसानुसार कलेक्शन*

| दिवस    | कमाई (कोटी) |
| ——- | ———– |
| दिवस 1  | 12.00       |
| दिवस 2  | 9.25        |
| दिवस 3  | 10.00       |
| दिवस 4  | 4.50        |
| दिवस 5  | 4.00        |
| दिवस 6  | 2.65        |
| दिवस 7  | 2.10        |
| दिवस 8  | 1.26        |
| दिवस 9  | 1.85        |
| दिवस 10 | 2.15        |
| दिवस 11 | 0.75        |
| दिवस 12 | 0.89        |

एकूण भारतातील कमाई: 53.37 कोटी
एकूण वर्ल्डवाइड कमाई: 69.68 कोटी

चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी त्यातील अ‍ॅक्शन सीन, टायगर श्रॉफचा परफॉर्मन्स आणि सिनेमॅटोग्राफीचं कौतुक केलं, तर काहींनी कथा थोडी कमकुवत असल्याची टीका केली. Baaghi 4 Box Office Collection

तरीसुद्धा, बागी 4 ने बॉक्स ऑफिसवर आपल्या अ‍ॅक्शन व स्टाईलच्या जोरावर आपली फ्रँचायझी टिकवून ठेवली आहे. विशेष म्हणजे, हरनाज संधूचा हा बॉलिवूड डेब्यू असलेल्या या चित्रपटात तिला चांगलीच दाद मिळत आहे. चित्रपट सध्या दुसऱ्या आठवड्यात चालू असून, वीकडेजमध्ये कमाई कमी झाली असली तरी वीकेंडला पुन्हा एकदा उसळी घेण्याची शक्यता आहे. चित्रपट 100 कोटींच्या क्लबकडे वाटचाल करतोय का, हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News