बिग बॉस मराठी विजेता सूरच चव्हाणच्या लग्नाबाबत अनेक आडाखे सातत्याने बांधले जात होते. आता याबाबात अंकिता प्रभू वालावलकरने एक कन्फर्म बातमी दिली आहे. अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच तो लग्न करणार आहे. अंकिताने तसा एक फोटो देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
अखेर सूरज चव्हाणचं ठरलं!
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांआधी एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. पण तो खरंच लग्न करतोय की कोणत्या प्रोजेक्टचा भाग आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण काही महिन्यांआधीच देखील एका व्हिडीओनिमित्तानं सूरज चव्हाणनं रील बायको दिसली होती. पण यावेळी सूरजनं शेअर केलेला फोटो मात्र खरा असल्याचं दिसतंय. गोलीगत सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असून त्याच्या बिग बॉसमधील बहिणीनेच ही बातमी कन्फर्म केली आहे.

अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच तो लग्न करणार आहे. सूरजची बिग बॉसच्या घरातील त्याची बहिण म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे. अंकिता नुकतीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या घरी म्हणजेच बारामतीला गेली होती. तिथे त्याने सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतली.
अंकिताच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
अंकिताने सूरज चव्हणच्या नव्या घराबाहेरचे फोटो शेअर केलेत. तिने एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने तिला मिठी मारली आहे. पण तिचा चेहरा लपवून त्यावर हार्ट इमोजी लावला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, सूरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येण शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट. या फोटोसोबत अंकिताने बँड बाजा वरात घोडा हे गाणं सुद्धा लावलं आहे. यावरून सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असून तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं क्लिअर झालं आहे.
त्यामुळे सूरज चव्हाणच्या चाहत्यांमध्ये सूरजच्या होणाऱ्या बायकोचा पहिला लूक पाहण्याची चांगलीच ओढ दिसत आहे. याबाबत सोशल मीडियावर देखील चर्चा घडताना दिसत आहेत. त्यामुळे याबाबत आता अधिकृत घोषणा नेमकी कधी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











