Bollywood’s richest actress Gayatri Joshi : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे एक दोन चित्रपट दिल्यानंतर दिसेनासे होतात. करिअरच्या उच्च बिंदूवर असताना बॉलिवूड सोडणाऱ्या या कलाकारांनी स्वत:चं वेगळं असं जग उभं केलं आहे, नवा व्यवसाय उभा केला आहे. यामध्ये एका खास अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे. या अभिनेत्रीने सुपरस्टारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र सुपर हिट चित्रपट दिल्यानंतर ती बॉलिवूडपासून लांब निघून गेली. मात्र आज ही अभिनेत्री ५० हजार कोटींची मालकीण आहे.
कोण आहे ही अभिनेत्री
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे गायत्री जोशी. गायत्रीने स्वदेश या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केलं आहे. स्वदेश चित्रपटाची ऑस्करसाठीही निवड करण्यात आली होती. स्वदेश हा गायत्रीचा एकमात्र चित्रपट आहे. या चित्रपटातील शाहरुख खान आणि गायत्रीच्या जोशीचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. स्वदेशनंतर गायत्री बॉलिवूडमध्ये मोठं नाव करेल असं म्हटलं जात होतं. मात्र बॉलिवूड सोडल्याने अनेकांना धक्का बसला होता.

का सोडलं बॉलिवूड?
गायत्रीने पदार्पणाचा हिट चित्रपट देऊनही चित्रपट क्षेत्रातून निघून गेली. पण का? स्वदेश रिलिज होताच गायत्रीने २००५ मध्ये उद्योजक विकास ओबेरॉयशी लग्न केलं होतं. आणि यानंतर ती चित्रपट क्षेत्रात पुन्हा कधीच आली नाही. विकास हे भारतातील बडे व्यायसायिकांपैकी एक आहेत. ते भारतातील रियल इस्टेट कंपनी ओबेरॉय कन्स्ट्रक्शन चालवतात. फोर्ब्समध्ये दिल्यानुसार, ते ५० हजार कोटी संपत्तीचे मालक आहेत. शाहरुख खानची हिरोइन सध्या ५० हजार कोटींची मालकीण आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.











